Maratha Reservation : विनोद पाटलांकडून सर्वोच्च न्यायालयात 'कॅव्हेट' दाखल

राजेभाऊ मोगल
शुक्रवार, 28 जून 2019

औरंगाबाद : मुंबई उच्च न्यायालयाने गुरुवारी (ता. 27) मराठा आरक्षण वैध ठरवले परंतु तरी सुद्धा काही जणांची भूमिका ह्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात जायची आहे. मी मराठा समाजाच्या वतीने न्यायालयात लढा देत होतो व अखेरपर्यंत देत राहील त्यामुळे आम्ही शुक्रवारी सकाळी सर्वोच्च न्यायालयात कॅव्हेट दाखल करणार आहोत असे याचिकाकर्ते विनोद पाटील यांनी गुरूवारीच (ता. 27) स्पष्ट केले होते.

त्याप्रमाणे शुक्रवारी (ता. 28)  विनोद पाटील यांच्यावतीने अॅड.संदीप देशमुख यांनी सर्वोच्च न्यायालयात कॅव्हेट दाखल केली आहे. यामुळे मराठा आरक्षणाविरोधात कोणीही सर्वोच्च न्यायालयात गेले तर न्यायालयाला अगोदर विनोद पाटील यांची बाजू ऐकावी लागेल. समाजाने माझ्यावर न्यायालयीन लढाई लढण्याची जबाबदारी दिली आहे. त्याची सुरुवातच सुप्रीम कोर्टापासून झाली होती. आता पुन्हा सुप्रीम कोर्टात जाण्याची वेळ आली तर त्याचीही माझी पूर्ण तयारी आहे. समाजानी जी जबाबदारी दिली ती पूर्णपणे पार पाडीन व अखेरपर्यंत लढा देईन असे विनोद पाटील यांनी सांगितले.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Vinod Patil submits caveat in supreme court