मराठा विद्यार्थ्यांना जातपडताळणी बंधनकारक नाही : तावडे

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 26 जून 2019

जात पडताळणी प्रमाणपत्र नसल्यामुळे विद्यार्थ्यांना या अभ्यासक्रमासाठी प्रवेश दिला जात नसल्याचा मुद्दा राष्ट्रवादी काँग्रेसचे सतीश चव्हाण यांनी उपस्थित केला होता. यावर बोलताना तावडे यांनी आज सकाळी यासंदर्भात बैठक घेतल्याचे सांगत या बैठकीत यावर तोडगा निघाल्याचे सांगितले.

मुंबई : आर्थिक आणि सामाजिक मागास प्रवर्गाच्या आरक्षणाअंतर्गत मराठा समाजातील विद्यार्थ्यांना वैद्यकीय आणि दंत वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमाचे प्रवेश जातपडताळणी नाही म्हणून थांबवले जाणार नाहीत, अशी माहिती उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी आज (बुधवार) विधानपरिषदेत दिली.

जात पडताळणी प्रमाणपत्र नसल्यामुळे विद्यार्थ्यांना या अभ्यासक्रमासाठी प्रवेश दिला जात नसल्याचा मुद्दा राष्ट्रवादी काँग्रेसचे सतीश चव्हाण यांनी उपस्थित केला होता. यावर बोलताना तावडे यांनी आज सकाळी यासंदर्भात बैठक घेतल्याचे सांगत या बैठकीत यावर तोडगा निघाल्याचे सांगितले.

कायद्यानुसार अन्य आरक्षणाअंतर्गत प्रवेश घेताना जात पडताळणी प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक आहे. मात्र आर्थिक आणि सामाजिक मागास प्रवर्ग आरक्षणाचा समावेश या कायद्यात अद्याप केलेला नाही. त्यामुळे यंदा एसईबीसी अंतर्गत वैद्यकीय पदव्युत्तर प्रवेश घेताना जातपडताळणी प्रमाणपत्र बंधनकारक नाही, असे तावडे यांनी सांगितले.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Vinod Tawde clears about caste validity certificate on medical admission