तावडे यांनी राजीनामा द्यावा : मुंडे

तावडे यांनी राजीनामा द्यावा : मुंडे

मुंबई : छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल अवमानकारक मजकूर असलेल्या पुस्तकाचे फक्त वितरण थांबवून चालणार नाही, तर या पुस्तकाच्या लेखक आणि प्रकाशकावर कठोर कारवाई करावी, तसेच याप्रकरणी शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी महाराष्ट्रातील जनतेची माफी मागून राजीनामा दिला पाहिजे, अशी मागणी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केली आहे. 

सर्व शिक्षा अभियानांतर्गत एक भाषिक पूरक वाचन पुस्तक योजनेंतर्गत पुरविण्यात आलेल्या समर्थ श्री रामदास स्वामी यांच्या पुस्तकामध्ये छत्रपती संभाजी महाराजांबद्दल अवमानकारक मजकूर प्रसिद्ध करण्यात आला आहे. याप्रकरणी तातडीने या पुस्तकाचे वितरण थांबवून लेखक, प्रकाशकावर कारवाई करण्याची मागणी दोन दिवसांपूर्वीच मुंडे यांनी केली होती. त्यानुसार महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, पुणेचे उपसंचालक विकास गरड यांनी काल एक पत्रक काढून सदर पुस्तकाचे वितरण थांबविण्याचे आदेश दिले आहेत. मात्र केवळ पुस्तक वितरण थांबवून चालणार नाही, तर महाराष्ट्राचे दैवत असलेल्या संभाजी महाराजांबद्दल अवमानकारक मजकूर प्रसिद्ध करणाऱ्या लेखक आणि प्रकाशकावर कारवाई केली पाहिजे.

तसेच राज्यातील शिवप्रेमी जनतेच्या भावना दुखावल्याबद्दल शिक्षणमंत्र्यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून जनतेची माफी मागावी, तसेच आपल्या पदाचा राजीनामा द्यावा, असे मुंडे यांनी म्हटले आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com