हिंसेचा मुकाबला अहिंसेने

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 10 एप्रिल 2018

मुंबई -  निवडणुका जिंकण्यासाठी भाजपकडून जातीय विद्वेष पसवरून समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू आहे. काँग्रेस पक्ष भाजपच्या हिंसेंचा मुकाबला अहिंसेने करेल आणि सामाजिक शांतता, सलोखा व बंधुत्वाची भावना कायम राखण्याची जबाबदारी पार पाडेल असे प्रतिपादन काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी केले.

मुंबई -  निवडणुका जिंकण्यासाठी भाजपकडून जातीय विद्वेष पसवरून समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू आहे. काँग्रेस पक्ष भाजपच्या हिंसेंचा मुकाबला अहिंसेने करेल आणि सामाजिक शांतता, सलोखा व बंधुत्वाची भावना कायम राखण्याची जबाबदारी पार पाडेल असे प्रतिपादन काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी केले.

भाजप सरकारच्या द्वेषपूर्ण भूमिकेमुळे देशातील व राज्यातील सामाजिक शांतता धोक्‍यात आल्याचा निषेध करत समाजात शांतता, सलोखा, बंधुत्वाची भावना कायम राखण्यासाठी काँग्रेसतर्फे राज्यातील सर्व जिल्हा मुख्यालयाच्या ठिकाणी एक दिवसाचा लाक्षणिक उपवास करण्यात आला. खासदार चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली परभणी येथे मोठ्या संख्येने काँग्रेस कार्यकर्त्यांनी आज उपवास केला. तत्पूर्वी सकाळी पाकिस्तानी दहशतवाद्यांशी लढताना शहीद झालेले हुतात्मा शुभम मस्तापुरे यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. माजी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सोलापूर येथे, विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली नाशिक येथे, विधान परिषदेचे उपसभापती माणिकराव ठाकरे, माजी मंत्री वसंत पुरके, शिवाजीराव मोघे यांच्या नेतृत्वाखाली यवतमाळ येथे, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या नेतृत्वाखाली पुणे येथे, माजी केंद्रीय मंत्री विलास मुत्तेमवार यांच्या नेतृत्वाखाली नागपूर येथे, आमदार मधुकरराव चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली उस्मानाबाद येथे, आमदार अब्दुल सत्तार यांच्या नेतृत्वाखाली औरंगाबाद येथे, आमदार अमर राजूरकर, आमदार अमिता चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली नांदेड येथे, आमदार शरद रणपिसे, आमदार सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली कोल्हापूर येथे, आमदार विजय वडेट्टीवार यांच्या नेतृत्वाखाली चंद्रपूर येथे, युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष विश्वजित कदम यांच्या नेतृत्वाखाली सांगली येथे, महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा चारूलता टोकस यांच्या नेतृत्वाखाली वर्धा येथे, प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस सचिन सावंत यांच्या नेतृत्वाखाली ठाणे येथे व राज्यातील इतर जिल्हा मुख्यालयाच्या ठिकाणी काँग्रेस नेते पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने एकत्र येत उपवास करून भाजप सरकारच्या जातियवादी भूमिकेचा निषेध केला.

Web Title: Violence against nonviolence