
राज्यपालांच्या शिफारशीचं 'ते' पत्र बनावट; राजभवनाकडून स्पष्ट
मुंबई : विधानपरिषदेच्या राज्यपाल नियुक्त बारा आमदारांची नियुक्ती रखडलेली असतानाच एका व्हायरल पत्रानं खळबळ उडाली आहे. राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहीत सहा नावांची शिफारस केल्याचं या पत्रातून दिसत आहे. पण आता या पत्रावर राजभवन कार्यालयानं स्पष्टीकरण दिलं आहे. शिफारशींचं हे पत्र बनावट असल्याचं राजभवननं म्हटलं आहे. (viral letter of governor recommendation forged Explanation given by Maha Raj Bhavan)
हेही वाचा: आर्थिक संकटातील श्रीलंकेला भारतानं केलेल्या मदतीचं IMFकडून कौतुक
बारा आमदारांच्या नियुक्तीपूर्वी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलेलं एक कथीत पत्र व्हायरलं झालं आहे. या पत्रातून विधान परिषदेसाठी राज्यपालांकडून ६ नावांची मुख्यमत्र्यांकडे शिफारस करण्यात आली आहे. बारापैकी सहा जणांच्या नावाची शिफारस राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांकडे केल्याचं हे पत्र २९ सप्टेंबर २०२० रोजी लिहिलं होतं.
हेही वाचा: राज ठाकरेंच्या सुरक्षेबाबत गृहमंत्र्यांना पत्र; बैठकीनंतर नांदगावकरांची माहिती
महाराष्ट्र विधीमंडळाच्या वरिष्ठ सभागृहाच्या रिक्त झालेल्या जागी वीरभद्रेश करबसव्वा बसवंती, रमेश बाबुराव कोकाटे, सतीश रामचंद्र घरत, संतोष अशोक नाथ, मोरेश्वर महादू भोंडवे, जगन्नाथ शिवाजी पाटील या नावांचा समावेश आहे. सामाजिक, राजकीय आणि उद्योग क्षेत्रातील वीस वर्षातील योगदान पाहता त्यांना महाराष्ट्र विधानपरिषदेच्या राज्यपाल नियुक्त सदस्य म्हणून शिफारस करत आहोत, असा या पत्रातील मजकूर आहे. यावर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची सही आणि राजमुद्रेचा शिक्काही असल्याचं सांगण्यात येत आहे.
राज्यपालांच्या व्हायरल पत्राची चौकशी व्हावी - काँग्रेस
राज्यपालांचा आणि मुख्यमंत्र्यांचा पत्रव्यवहार झाला असेल तर यातील वस्तुस्थिती समोर आणावी. हे पत्र जर बनावट असेल तर त्याचा योग्य तपास व्हायला हवा. राज्यपाल भवनातून अशी बनावट पत्र जारी केले जातात का? यामागे कोण आहे? याचाही तपास व्हायला हवा, असं काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटलं आहे.
Web Title: Viral Letter Of Governor Recommendation Forged Explanation Given By Maha Raj Bhavan
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..