#ViralSatya या देशात आहे चक्क ‘बिअरची पाईपलाईन’

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 6 ऑगस्ट 2018

बेल्जियम मधील ब्रूक्स या गावात ही पाईपलाईन आहे. दोन वर्षांपूर्वी या गावात बेल्जियम मधील एका बिअर उत्पादक कंपनीकडून पहिली पाईपलाईन टाकण्यात आली होती.

आतापर्यंत आपण पाण्याची पाईपलाईन पाहिलेली आहे. अगदी गॅस, पेट्रोल यांची सुद्धा पाईपलाईन पाहिलेली आहे मात्र 'बेल्जियम' या देशात चक्क बिअर ची पाईपलाईन टाकण्यात आलेली आहे. ही पाईपलाईन सर्वांसाठीच कुतूहलाचा विषय बनली आहे.

बेल्जियम मधील ब्रूक्स या गावात ही पाईपलाईन आहे. दोन वर्षांपूर्वी या गावात बेल्जियम मधील एका बिअर उत्पादक कंपनीकडून पहिली पाईपलाईन टाकण्यात आली होती. बिअरची वाहतूक करण्यासाठी खूप वेळ खर्ची पडायचा. हा वेळ आणि लागणार खर्च वाचवण्यासाठी मूळ 'प्लांट' पासून गावातील बॉटलींग प्लांट पर्यंत लांबलचक पाईपलाईन टाकण्यात आली.

4 किलोमीटरच्या या पाईपलाईन मधून तासाला 4 हजार लिटर बिअर वाहून नेण्यात येते. यात तासाला बिअरच्या 12 हजार बाटल्या भरल्या जातात. बिअर पिणाऱ्यांमध्ये बेल्जियमचा जगात सहावा क्रमांक लागतो. त्यामुळे तळीरामांची खास काळजी घेतल्याचं दिसून येत आहे.

Web Title: Viral Satya Beer pipeline in Belgium