#ViralSatya पावसामुळे रिक्षावरुन काढली अंत्ययात्रा

बुधवार, 18 जुलै 2018

रिक्षेवरुन काढलेल्या अंत्ययात्रेचा एक व्हिडीओ सध्या सोशल मिडीयावर व्हायरल होत आहे. रिक्षेला धक्का मारत अंत्ययात्रा काढत असल्याचं या व्हिडीओत दिसत आहे. मुंबईतील नालासोपारा येथील हा व्हिडीओ आहे.

मुंबई- रिक्षेवरुन काढलेल्या अंत्ययात्रेचा एक व्हिडीओ सध्या सोशल मिडीयावर व्हायरल होत आहे. रिक्षेला धक्का मारत अंत्ययात्रा काढत असल्याचं या व्हिडीओत दिसते आहे. मुंबईतील नालासोपारा येथील हा व्हिडीओ आहे. रिक्षेवरून अंत्ययात्रा न्यावी लागली इतकी वाईट वेळ का यावी? असा प्रश्न हा व्हिडीओ बघितला की पडतो.

आमचे प्रतिनिधी प्रसेनजित इंगळे यांनी नालासोपाऱ्यात जाऊन या घटनेची चौकशी केली. नालासोपाऱ्याच्या समर्थ नगरात राहणाऱ्या राजकुमार जयसवाल यांचा विजेचा शॉक लागून मृत्यू झाला. घटनेच्या दिवशी मुंबईत खूप पाऊस पडत होता. परंतू घरात भाजीपाला नसल्याने भरपावसात त्यांना बाजारात जावं लागलं. यावेळी महावितरणची विजेची तार उघडी असल्याने शॉक लागून त्यांचा मृत्यू झाला. वसई-विरारमध्ये पावसाने कहर माजवला होता तेव्हा अत्यावश्यक सेवा पुरवणेही कठिण झाले होते. पाऊस जास्त असल्याने काही वाहन मिळत नव्हते त्यामुळे जयसवाल यांच्या कुटूंबियांनी नाईलाजास्तव रिक्षेच्या टपावरून मृतदेह स्मशानात नेला होता. 

व्हिडीओ- 

Web Title: viral satya dead body on auto video

टॅग्स