मिठाच्या पाण्याने आंघोळ करणे थंडीत फायदेशीर?

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 31 डिसेंबर 2018

हिवाळा सुरू आहे. हिवाळ्यात थंडीमुळे त्वचा कोरडी पडते. थंडीमुळे केसांमध्ये कोंडादेखील होतो. थंडीमध्ये अनेक समस्या असतात; पण या सगळ्या समस्यांवर उपाय म्हणून थंडीत मिठाच्या पाण्यानं आंघोळ करावी, असा दावा करण्यात आलाय. पण, खरंच थंडीत मिठाच्या पाण्यानं आंघोळ करणं त्वचेसाठी चांगलं आहे का? याची सत्यता जाणून घेण्याचा आम्ही प्रयत्न केला; पण व्हायरल मेसेजमध्ये काय दावा केलाय पाहा. 

व्हायरल मेसेज 
थंडीत मिठाच्या पाण्यानं आंघोळ करणं फायदेशीर असतं. मिठाच्या पाण्यानं आंघोळ केल्यामुळं त्वचा कोरडी राहते.?

हा मेसेज व्हायरल झाल्यानं याची सत्यता जाणून घेणं गरजेचं आहे. मिठाच्या पाण्यानं आंघोळ केल्यामुळं त्वचा चांगली स्वच्छ होऊन चमकही येते असाही दावा केलाय. हिवाळा सुरू असल्यानं अनेक जण हा प्रयोग करून बघतायत. पण हे खरं आहे का? याबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी त्वचारोगतज्ज्ञांची भेट घेतली. त्यांच्याकडून अधिक माहिती जाणून घेतली. त्वचारोगतज्ज्ञ विक्रांत सौजी यांच्या मते, मिठामध्ये अँटीबायोटिक गुण असतात. तसेच मिठामुळे त्वचेला जास्त प्रमाणात फायदा होईल हे शक्‍य नसल्याचं मत डॉक्‍टरांनी व्यक्त केलंय. त्यामुळं आमच्या पडताळणीत काय सत्य समोर आलं पाहा... 

नेमके सत्य 
- मिठाच्या पाण्यानं आंघोळ केल्यामुळे त्वचेचा कोरडेपणा कमी होत नाही 
- साबण वापरल्यानंतर त्वचा अजून कोरडी पडते 
- आंघोळ केल्यानंतर तेल लावल्यामुळं त्वचा तजेल राहते 
- कोरडेपणा कमी करण्यासाठी अंगाला तेलानं मालिश करावी 
- मिठामुळं त्वचेला फायदा होतो याला शास्त्रीय कारण नाही 
ताप आला की मिठाच्या पाण्याची घडी कपाळावर घालतात. त्याने ताप उतरतो, असंही म्हणतात. त्याचा फायदाही कित्येकांना झालाय. पण मिठाच्या पाण्यानं आंघोळ केल्यानं त्वचा कोरडी राहते, हा दावा आमच्या पडताळणीत असत्य ठरला. त्यामुळं असे प्रयोग करण्याआधी डॉक्‍टरांचा किंवा तज्ज्ञांचा सल्ला घ्या. 

Web Title: Viral satya news bath with salt water

टॅग्स