#ViralSatya आता लवकरच बिअरवर चालणार कार ?

रविवार, 12 ऑगस्ट 2018

पेट्रोल,डिझेल नसलं तरीही तुमची गाडी चालू शकेल. आता बिअरवरही कार चालणं शक्य आहे. 2022 पर्यंत हा प्रयोग यशस्वी होईल असा मेसेज असलेला एक व्हिडीओ व्हायरल होत आहे.

लवकरच आता तुमची कार बिअरवरही धावू शकेल... हे ऐकून तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसला ना. पण, हो आता हे शक्य असल्याचा दावा सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या एका व्हिडीओतून करण्यात आला आहे. बिअरपासून इंधन बनवण्यात संशोधकांना यश आल्याचं सांगितलं जात आहे. 

पेट्रोल,डिझेल नसलं तरीही तुमची गाडी चालू शकेल. आता बिअरवरही कार चालणं शक्य आहे. 2022 पर्यंत हा प्रयोग यशस्वी होईल असा मेसेज असलेला एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. बिअरवर आता गाडी चालू शकते हे ऐकून तुम्हाला आश्चर्याचा धक्काच बसला असेल. पण, बिअरवर गाडी चालवणं कसं काय शक्य आहे? पेट्रोल, डिझेलपेक्षा बिअरवर गाडी चालवणं सामान्यांना परवडेल का? हा प्रश्न आम्हालाही पडला. त्यामुळं आम्ही याची सत्यता पडताळली. 

बियरमध्येच नव्हे तर अल्कोहोलमध्ये असलेल्या इथेनॉलला ब्यूटेनॉलमध्ये बदलून त्यापासून कार चालवण्यात शक्य असल्याचं स्पष्ट आहे. पण, ते कितपत योग्य आहे? हा प्रयोग सामान्यांना परवडणारा आहे का? त्यापासून काही प्रदुषण होऊ शकतं का? 

काय आहे सत्य?
- बिअरमध्ये इथेनॉल असल्यानं कार चालू शकते
- कार्बन मोनोऑक्साईड, सल्फरडॉय ऑक्साईडमुळं वायू प्रदूषण होऊ शकतं 
मोठ्या प्रमाणात ध्वनी प्रदूषण होऊ शकतं
- बिअरवर कार चालवणं आर्थिकदृष्ट्या परवडणारं नाही

बिअरवरच नव्हे तर अल्कोहोलमध्ये इथेनॉल असल्यानं त्यापासून कार चालवणं शक्य आहे. पण, ते खर्चिक असून, त्याचा तोटाही होऊ शकतो. गाडीचं नुकसानही होऊ शकतं. ऐकायला जरी हा प्रयोग चांगला वाटला तर तो सामान्यांना परवडणारा नाही. 

Web Title: viral satya viral video beer as fuel for car