#ViralSatya पैसे दिले तरच मिळतं भाविकांना मंदिरात दर्शन ?

सोमवार, 13 ऑगस्ट 2018

महाराष्ट्रात देवाच्या दारातही सर्रास पैसे उकळले जात आहेत, मंदिराच्या बाहेर बसलेला एक पुजारी दर्शनासाठी येणाऱ्या प्रत्येक भाविकाकडून पैसे मागतोय असा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओत पुजारीच भाविकांकडून पैसे घेऊन दर्शन देत असल्याचं दिसत आहे. आमच्या व्हायरल सत्य हेल्पलाईनवर अनेकांनी हा व्हिडीओ पाठवला आणि या पुजाऱ्याची दुकानदारी बंद करा असं सांगितलं. त्यामुळे आम्ही या व्हिडीओची सत्यता पडताळून पाहिली आणि यामागचं सत्य शोधलं.

मंदिराच्या बाहेर बसलेला पुजारी रांगेत येणाऱ्या प्रत्येक भाविकाकडून पैसे घेतोय, पैसे दिले नाहीत तर तो या मंदिरात जायला देत नाही. इतकंच नव्हे तर भाविकांसोबत पुजारी भांडणंही करतोय असे या व्हिडीओत दिसत आहे. व्हिडीओत बोलत असलेली व्यक्ती मराठीत बोलतेय त्यावरून हा व्हिडीओ महाराष्ट्रातील असल्याचं स्पष्ट झालं. या व्हिडीओची पडताळणी करत असताना हे मंदिर पंढरपूरातील असल्याचं समजलं. या ठिकाणी संत जनाबाई मंदिराबाहेर पुजारी विकास गुरव बसायचे. भाविकांना आडवून त्यांच्याकडून जबरदस्तीनं पाच रुपये घेत होते असा दावा भाविकांनी केलाय. पण, आता भाविकांनी या पुजाऱ्याची वारंवार तक्रार केल्यानं मंदिर व्यवस्थापनानं पैसे घेणाऱ्या पुजाऱ्यावर कारवाई केली आहे.

व्हायरल सत्य :
- पुजारी भाविकांकडून 5 रुपये घेऊन दर्शनासाठी सोडत होता
- मंदिरात गर्दी झाल्यानं पुजाऱ्यानं पैसे घेतल्याचा विश्वस्तांचा दावा
- पुजारी विकास गुरववर कारवाई करण्यात आलीय
- यापुढे कोणत्याही भाविकाकडून दर्शनासाठी पैसे घेतले जाणार नाही

Web Title: viral satya viral video Priest taking money