'ग्लोबल टीचर पुरस्कार' जाहीर झाल्यानंतर डिसलेंच्या जल्लोषाचा व्हिडीओ होतोय व्हायरल

disale1.
disale1.

पुणे- शिक्षण क्षेत्रातील सन्मानाचा सात कोटींचा ग्लोबल टीचर पुरस्कार सोलापूरचे शिक्षक रणजितसिंह डिसले यांनी पटकावला आहे. पुरस्कार कार्यक्रमावेळी डिसले आपल्या सोलापूरमधील घरुन व्हर्चुअल पद्धतीने हा कार्यक्रम पाहात होते. सुप्रसिद्ध आंतरराष्ट्रीय अभिनेते स्टीफन फ्राय यांनी विजेता म्हणून डिसले यांचे नाव जाहीर केले. विजेता ठरताच डिसले यांनी केलेला जल्लोष सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.  

शिक्षक रणजितसिंह डिसले यांना शिक्षण क्षेत्रातील मानाचा ग्लोबल टीचर पुरस्कार मिळाल्यानंतर जगभरातून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. पुरस्काराची घोषणा होताच डिसले यांनी जल्लोष करत आपल्या आई-वडिलांची गळाभेट घेतली. डिसले आणि त्यांच्या कुटुंबीयांना झालेला आनंद त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे दिसत होता. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला जात आहे. 

डॉ. शीतल आमटे- करजगी यांचं शेवटचं चॅटिंग कुणाशी? पासवर्ड स्वतःचे डोळे ठेवल्यानं...

युनेस्को व लंडनस्थित वार्की फाऊंडेशन यांच्या वतीने दिला जाणारा 'ग्लोबल टीचर' पुरस्कार डिसले यांना जाहीर झाला आहे. या पुरस्कारानंतर राज्यपाल, शिक्षणमंत्र्यांसह राज्यातील सर्वच स्तरांतून डिसले यांचे कौतुक होत आहे. शिक्षण विभागाच्या समितीने बालभारतीच्या पुस्तकात क्‍यूआर कोडचा वापर करण्यासाठी त्यांनी काम केले आहे. सदर पुरस्काराचा मान प्रथमच भारत देशाला मिळाला आहे.

लंडनमधील "नॅचरल हिस्ट्री म्युझियम'मध्ये झालेल्या समारंभात स्टीफन फ्राय यांनी पुरस्काराची अधिकृत घोषणा केली. असा पुरस्कार मिळवणारे डिसले हे पहिलेच भारतीय शिक्षक असून, ते सोलापूर जिल्ह्यातील आहेत. साहजिकच देशाच्या शैक्षणिक क्षेत्रात आज महाराष्ट्र राज्य आणि सोलापूर जिल्ह्याचे नाव झळकले आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे जगभरातील 140 देशांतील 12 हजारहून अधिक शिक्षकांच्या नामांकनातून अंतिम विजेता म्हणून डिसले गुरुजींची घोषणा करण्यात आली आहे. त्यांनी विकसित केलेल्या क्‍यूआर कोड पद्धतीचा प्रथम महाराष्ट्र शासनाने पाठयपुस्तकांमध्ये वापर चालू केला. त्यानंतर त्याची देशपातळीवर दखल घेऊन संपूर्ण भारतातील शालेय पुस्तकात त्यांच्या क्‍यूआर कोड पद्धतीचा वापर चालू झाला. हा शैक्षणिक क्षेत्रातील खूप मोठा क्रांतिकारक बदल समजला जातो. आता त्यांच्या याच क्‍यूआर कोड पद्धतीची जागतिक पातळीवरून दखल घेण्यात आली आहे
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com