सरकारने वारीला 5 लाख रेनकोट वाटल्यामागे काय आहे सत्य?

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 3 जुलै 2019

मागील दोन-तीन दिवसांपासुन एका दिंडीचा व्हिडीओ सोशल मीडियावर वायरल होतोय. ज्यामध्ये पिवळे रेनकोट घातलेले वारकरी भर पावसात चालताना दिसत आहेत. या व्हिडीओच्या आधारे फडणवीस सरकारने वारकऱ्यांना पाच लाख रेनकोटचे वाटप केल्याची माहिती सोशल मिडियावर व्हायरल होत आहे.

पुणे : मागील दोन-तीन दिवसांपासुन एका दिंडीचा व्हिडीओ सोशल मीडियावर वायरल होतोय. ज्यामध्ये पिवळे रेनकोट घातलेले वारकरी भर पावसात चालताना दिसत आहेत. या व्हिडीओच्या आधारे फडणवीस सरकारने वारकऱ्यांना पाच लाख रेनकोटचे वाटप केल्याची माहिती सोशल मिडियावर व्हायरल होत आहे.

२० जून रोजी 'सकाळ'मध्ये यासंदर्भातील बातमी प्रसिद्ध झाली होती. त्या बातमीनुसार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस निर्मल वारी अभियान य़ा उपक्रमाअंतर्गत पाच लाख रेनकोट वाटणार असल्याचे जाहीर करण्यात आले होते.

मुख्यमंत्री कार्यालयातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये वारकऱयांना रेनकोटचे वाटप केले आहे. तब्बल पन्नास पालखी सोहळ्यातील वारकऱयांना रेनकोट दिले आहेत. राज्यभरात त्यासाठी सुमारे तीस हजारांवर स्वयंसेवकांनी काम केले आहे. 

घोषणेतील आकडा पाच लाख असला, तरी प्रत्यक्षात अनेक संस्था पुढे आल्यामुळे सहा लाखांवर रेनकोटचे वाटप झाल्याचे सूत्रांनी सांगितले.

राज्यातील प्लॅस्टिक बंदीमुळे वारकऱयांची पावसात अडचण होऊ नये, यासाठी मुख्यमंत्र्यांनी रेनकोट वाटपाची योजना आखली होती.

मात्र, आता याबाबत सोशल मीडियावर शंका निर्माण करणाऱ्या पोस्ट देखील पहायला मिळत आहे. “हे रेनकोट फिनोलेक्स इंडस्ट्री लिमिटेडने वाटल्याची शंका काही पोस्टमधून उपस्थित केली जात आहे. मात्र, प्रत्यक्षात निर्मल वारी अभियानाचा हा उपक्रम आहे.

फिनोलेक्स कंपनीची साईट तपासल्यावर समजते की, यावर्षी कंपनीने प्रवासादरम्यान आणि 10,000 पेक्षा अधिक रेनकोट, 50,000 पिशव्या दिल्या. 

रस्त्यावर पिवळ्या रेनकोटमध्ये प्रचंड संख्येने दिसणारे वारकरी निर्मल वारी अभियानातून वाटलेल्या रेनकोटमध्ये आहेत. व्हिडिओ बाबतीतही सोशल मीडियावर वेगळेच सत्य सांगण्यात येत आहे.

दरम्यान, काही भाजप समर्थकांकडून सरकारने रेनकोट वाटले असल्याचा दावा केला जात आहे. प्रत्यक्षात हा मुख्यमंत्र्यांचा स्वतःचा उपक्रम आहे.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Viral video maharashtra government distributed raincoat for Warkari