Loksabha 2019 : काँग्रेसचा स्टार प्रचारक ‘मातोश्री’वर

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 5 एप्रिल 2019

मुंबई - काँग्रेसच्या स्टार प्रचारकाच्या यादीतील विश्‍वनाथ पाटील या नेत्याने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतल्याने काँग्रेसमध्ये घालमेल सुरू आहे.

मुंबई - काँग्रेसच्या स्टार प्रचारकाच्या यादीतील विश्‍वनाथ पाटील या नेत्याने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतल्याने काँग्रेसमध्ये घालमेल सुरू आहे.

लोकसभा निवडणुकीत उमेदवारी न मिळालेल्यांनी विरोधी पक्षाशी हातमिळवणी करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. तर काहींनी विरोधी पक्षात प्रवेश करून आपल्या पदरात उमेदवारी पाडून घेतली आहे. आता काँग्रेसच्या स्टार प्रचारक यादीत असलेले कुणबी सेनेचे अध्यक्ष विश्वनाथ पाटील यांनी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली आहे. भिवंडी ग्रामीण मतदारसंघातून उमेदवारी नाकारल्याने विश्वनाथ पाटील नाराज आहेत. त्यामुळे त्यांनी विरोधी पक्षाचा आसरा घेतल्याची चर्चा सुरू  झाली आहे.

पाटील यांची नाराजी काँग्रेसकडून दूर करण्यात आली नाही. त्यामुळे त्यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. भिवंडी ग्रामीणमधून काँग्रेसकडून निवडणूक लढविण्याची तयारी विश्वनाथ पाटील यांनी केली होती. याबाबत ७ एप्रिल रोजी आपल्या पक्षाची भूमिका स्पष्ट करू, असे पाटील यांनी सांगितले. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत विश्वनाथ पाटील यांच्या अध्यक्षतेखाली कुणबी सेनेने काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीच्या उमेदवाराला पाठिंबा दिला होता. त्याचप्रमाणे विश्वनाथ पाटील यांनी स्वत: काँग्रेसतर्फे भिवंडी मतदारसंघातून निवडणूक लढवून मोदी लाटेच्या प्रभावात तीन लाखांहून अधिक मते घेतली होती. 

Web Title: Vishwanath Patil leader in the list of Congress star campaigner meet Uddhav Thackeray