आषाढीत विठ्ठल मंदिराला साडेचार कोटींचे उत्पन्न

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 21 जुलै 2019

आषाढी यात्रेच्या काळात वारकरी भाविकांकडून ३ जुलै ते १७ जुलै या १५ दिवसांत विविध माध्यमांतून एकूण ४ कोटी ४० लाख ३७ हजार ७८६ रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. आषाढी यात्रा कालावधीत सुमारे ७ लाख २८ हजार इतक्‍या भाविकांनी श्री विठ्ठल-रुक्‍मिणीचे  दर्शन घेतले.

पंढरपूर - आषाढी यात्रा काळात यंदा श्री विठ्ठल-रुक्‍मिणी मंदिर समितीला ४ कोटी ४० लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. गेल्या वर्षीच्या उत्पन्नात यंदा तब्बल एक कोटी ५० लाखांची विक्रमी वाढ झाली आहे, अशी माहिती प्रांताधिकारी तथा मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी सचिन ढोले यांनी दिली. 

आषाढी यात्रेच्या काळात वारकरी भाविकांकडून ३ जुलै ते १७ जुलै या १५ दिवसांत विविध माध्यमांतून एकूण ४ कोटी ४० लाख ३७ हजार ७८६ रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. आषाढी यात्रा कालावधीत सुमारे ७ लाख २८ हजार इतक्‍या भाविकांनी श्री विठ्ठल-रुक्‍मिणीचे  दर्शन घेतले.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Vitthal temple income around 4.5 crore rupees in aashadi