ध्वनिप्रदूषण केलेल्या मंडळांना परवानगी नाही

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 4 मे 2017

मुंबई - रुग्णालयांजवळच्या रस्त्यांवर वाजणाऱ्या वाहनांच्या भोंग्यांमुळे कशा प्रकारे आणि किती ध्वनिप्रदूषण होते, याचा तपशील दाखल करण्याचे निर्देश बुधवारी मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारला दिले. राज्यभरात ज्या सार्वजनिक मंडळांनी उत्सवाच्या वेळी ध्वनिप्रदूषण केल्याचे आढळले आहे, अशा मंडळांना चालू वर्षात परवानगी देऊ नये, असेही खंडपीठाने स्पष्ट केले आहे. 

उत्सवाच्या वेळी सर्रास ध्वनिप्रदूषण करणाऱ्या मंडळांवर पोलिसांनी कारवाई करावी, असे आदेश न्यायालयाने दिले आहेत. माहीम पोलिस ठाण्याच्या हद्दीत अशा उल्लंघनाच्या घटना घडल्या आहेत. मात्र, संबंधितांवर कारवाई करण्यात चुकारपणा केल्यामुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचे निर्देश न्या. अभय ओक यांच्या खंडपीठाने दिले होते. बुधवारी राज्य सरकारच्या वतीने कारवाईबाबतची माहिती खंडपीठाला देण्यात आली. त्यानुसार त्यांना केवळ समज देण्यात आली असून, त्यांनी केलेल्या कृत्याबाबत नाराजी व्यक्त करण्यात आली होती. राज्य सरकारच्या या कारवाईबाबत खंडपीठाने नाराजी व्यक्त केली. सरकार ध्वनिप्रदूषण नियंत्रित करण्याबाबत गंभीर नाही, असे मत खंडपीठाने व्यक्त केले. 

वाहनांमुळे होणाऱ्या प्रदूषणाचा मुद्दाही या सुनावणीत उपस्थित झाला. याबाबत तपशील दाखल करण्याचे निर्देश न्यायालयाने दिले. ज्या मंडळांनी ध्वनिप्रदूषणाबाबतच्या नियमांचे पालन केलेले नाही, त्यांना पुढील उत्सवांसाठी परवानगी देऊ नये, असा आदेश न्यायालयाने दिला. पोलिस अधिकाऱ्यांवर बजावलेल्या अवमान नोटिशीवर 9 जूनला सुनावणी होणार आहे. 

Web Title: Voice-pollinated circles are not allowed