मतदार याद्यांतील घोळाबद्दल उच्च न्यायालयात याचिका 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 7 मार्च 2017

मुंबई - नुकत्याच झालेल्या महापालिका निवडणुकांतील मतदार याद्यांत झालेल्या घोळामुळे लाखो मतदारांना मतदान करता आले नाही, असा आरोप करणारी जनहित याचिका राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी सोमवारी मुंबई उच्च न्यायालयात दाखल केली आहे. 

मुंबईसह ठाणे, पुणे व अन्य महापालिका निवडणुकांच्या वेळी सुमारे 14 लाख मतदारांची नावे गायब झाल्याचे उघड झाले होते. ही परिस्थिती राज्य निवडणूक आयोगाच्या ढिसाळ व्यवस्थापनामुळे निर्माण झाली, असा आरोप आव्हाड यांनी केला आहे. निवडणुकांची पूर्वतयारी वेळेवर केली असती आणि मतदार याद्यांबाबत जनजागृती मोहीम राबवली असती, तर असे प्रकार घडले नसते, असे याचिकादारांचे म्हणणे आहे. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांत मतदान केलेल्यांची नावे अचानक महापालिका व जिल्हा परिषदांच्या निवडणुकांत गहाळ कशी होतात, असा सवाल याचिकेत उपस्थित करण्यात आला आहे. 2019 च्या निवडणुकांपूर्वी निवडणूक आयोगाने मतदार याद्यांचे पुनरावलोकन करावे आणि योग्य यादी तयार करावी, अशी मागणी याचिकेत करण्यात आली आहे. न्यायालयाने एक समिती नेमून आपल्या शिफारशी आयोगाकडे सुपूर्द करण्याची मागणीही करण्यात आली आहे. ऍड. सुहास ओक यांच्यामार्फत ही याचिका आव्हाड यांनी केली असून, लवकरच नियमित न्यायालयात याचिकेवर सुनावणी होणार आहे. 

Web Title: Voter lists in its jumble