गुन्हे केलेल्या उमेदवारांची माहिती मतदारांना कळणार

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 22 जानेवारी 2017

मुंबई - महापालिकेच्या निवडणुकीत उतरणाऱ्या उमेदवारांची माहिती मतदारांपुढे मांडण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने घेतला आहे.

मुंबई - महापालिकेच्या निवडणुकीत उतरणाऱ्या उमेदवारांची माहिती मतदारांपुढे मांडण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने घेतला आहे.

निवडणुकीसाठी पात्र ठरणाऱ्या सर्व उमेदवारांचे प्रतिज्ञापत्र वृत्तपत्रांत प्रसिद्ध करण्याबरोबरच मतदान केंद्राबाहेरही लावण्यात येणार आहे, असे राज्याचे निवडणूक आयुक्त जे. एस. सहारिया यांनी शनिवारी सांगितले.
उमेदवारांचे प्रतिज्ञापत्र आतापर्यंत निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर जाहीर केले जात होते. आता महापालिका निवडणुकीत सर्व पात्र उमेदवारांचे प्रतिज्ञापत्र वृत्तपत्रांत जाहीर करण्यात येणार आहे. निवडणूक केंद्राबाहेरही हे प्रतिज्ञापत्र लावण्यात येईल, असे सहारिया यांनी सांगितले. यामुळे निवडणुकीच्या मैदानात उतरलेल्या गुन्हेगारी प्रवृत्तीच्या उमेदवारांची माहिती मतदारांना मिळेल. मुंबईत 2012च्या निवडणुकीत 42 टक्के मतदान झाले होते. हा टक्का यंदा वाढवण्यासाठी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची मदत घेण्यात येणार आहे. या विद्यार्थ्यांमार्फत जनजागृती करण्याचा निर्णय आयोगाने घेतला आहे.

उमेदवारांचे दिवसभर चित्रीकरण
निवडणुकीवर होणारा खर्च लपवण्याचा प्रयत्न उमेदवार करण्याची शक्‍यता आहे, त्यामुळे प्रत्येक उमेदवारावर अधिकाऱ्यांची पाळत राहील. उमेदवारांच्या दिवसभरातील हालचालींचे व्हिडिओ चित्रीकरण करण्यात येणार आहे.

निवडणुकीसाठी 45 हजार कर्मचारी
निवडणुकीच्या दिवशी तब्बल 45 हजार कर्मचाऱ्यांची गरज भासेल. 10 टक्के कर्मचारी राखीव ठेवण्यात येतील. त्यांचे प्रशिक्षण लवकरच सुरू होईल.

Web Title: The voters know about the candidates Crime

टॅग्स