#VoteTrendLive : पहिल्या तासात मुंबईत शिवसेना; पुण्यात भाजप आघाडीवर

टीम ई सकाळ
गुरुवार, 23 फेब्रुवारी 2017

राज्यभरातील दहा महापालिका आणि 25 जिल्हा परिषदांच्या मतमोजणीला सुरूवात झाली आहे. सुरूवातीच्या अर्ध्या ते पाऊण तासात टपाली मतदानाची मोजणी झाली. त्यानंतर महापालिकांची प्रभागनिहाय मतमोजणी सुरू झाली आहे.

राज्यभरातील दहा महापालिका आणि 25 जिल्हा परिषदांच्या मतमोजणीला सुरूवात झाली आहे. सुरूवातीच्या अर्ध्या ते पाऊण तासात टपाली मतदानाची मोजणी झाली. त्यानंतर महापालिकांची प्रभागनिहाय मतमोजणी सुरू झाली आहे. 

राज्यात सर्व मतमोजणी केंद्रांवर चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. मतमोजणी केंद्रांबाहेर सकाळी नऊ पासूनच मोठी गर्दी दिसत आहे. राज्यात पिंपरी-चिंचवड आणि अमरावती महापालिकांमध्ये एकेक 

पिंपरी-चिंचवड महापालिकेतील ३२ प्रभागांपैकी प्रभाग क्रमांक ६ ड मध्ये रवी लांडगे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. अमरावतीमध्ये भाजपच्या रिता पडोळे बिनविरोध निवडून आल्या आहेत. 

महापालिका निकाल : 
मुंबई  :

 • शिवसेनेची पहिल्यापासून आघाडी 
 • शिवसेनेला 27 वॉर्ड, तर भाजपला 14, काँग्रेस 6, राष्ट्रवादीला दोन आणि मनसेला 1 जागेवर आघाडी
 • 150 वॉर्डमध्ये गोंधळामुळे मतमोजणी थांबविण्यात आली.

पुणे :

 • पुण्यात भाजप 20, राष्ट्रवादी 7 जागांवर पुढे
 • शिवसेना, काँग्रेस प्रत्येकी एका जागेवर आघाडीवर

नाशिक : 

 • महानगरपालिकेत भाजपचा एक, शिवसेनेचे दोन, कॉंग्रेसचा एक उमेदवार आघाडीवर. 
 • प्रभाग क्रमांक 1 आणि 16 मधील पोस्टल मतांची मोजणी सुरू. 
 • प्रभाग क्रमांक 13 मधून गजानन शेलार, स्नेहल चव्हाण, वत्सला खैरे आघाडीवर. 
 • प्रभाग क्रमांक सात मधील भाजप उमेदवार स्वाती भामरे पहिल्या फेरीनंतर 1 हजार मतांनी आघाडीवर 
 • प्रभाग क्रमांक सात मधील भारतीय जनता पक्षाच्या उमेदवार हिमगौरी आडके, योगेश हिरे, स्वाती भामरे यांची तर शिवसेनेचे अजय बोरस्ते आघाडीवर 

उल्हासनगर : 

 • शिवसेना आठ जागांवर आघाडीवर 
 • शैलेश पाटील उल्हासनगर 4 मध्ये आघाडीवर 

अमरावती : 

 • जवाहर स्टेडियम प्रभाग क्र 7 ओ बी सी संवर्गातून भाजपच्या रीता पडोळे बिनविरोध विजयी

जिल्हा परिषद निकाल : 

महाराष्ट्रातील 25 जिल्हा परिषदांची मतमोजणी सुरू झाली आहे. त्याचे लाईव्ह अपडेटस् असेः

सातारा : 

 • राष्ट्रवादी दोन तर भाजप एका ठिकाणी आघाडीवर
 • कराड रेठरे बुद्रुक गटातील भाजपच्या शामबाला घोडके आघाडीवर

पुणे : 

 • भाजप-11, राष्ट्रवादी-5 व काँग्रेस एका जागेवर आघाडीवर

नाशिक : 

 • देवळा तालुका भाजप धनश्री केदा आहेर पाच हजार मतांनी विजयी
 • येवला पाटोदा गटाच्या पहिल्या फेरीनंतर राष्ट्रवादीचे संजय बनकर 1576 मतांनी आघाडीवर. 
 • बागलान येथील पठावे दिगर गटातील अपक्ष उमेदवार गणेश आहिरे पहिल्या फेरीनंतर आघाडीवर. 
Web Title: #VoteTrendLive Municipal Corporation, Zilla Parishad election results Maharashtra