मुंबईचा महापौर शिवसेनेचाच- उद्धव ठाकरे

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 23 फेब्रुवारी 2017

मुंबईचा महापौर शिवसेनेचाच होईल. शिवसेना नंबर वनचा पक्ष राहिला आहे. विधानसभेनंतर निकालांमध्ये फरक पडत असून, शिवसेना आपले स्थान बळकट करत आहे. भाजपने सत्ता, संपत्ती पणाला लावली होती, त्यानुसार त्यांच्या यशाचे विश्लेषण करा.

मुंबई - मुंबईचा पुढील महापौर शिवसेनेचाच असेल असे सांगत, युतीच्या निर्णयाबाबत घाई नाही, असे वक्तव्य शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केले आहे.

मुंबई महापालिकेच्या निकालामध्ये शिवसेना 84 आणि भाजप 82 जागा जिंकण्यात यशस्वी झाले. शिवसेना आणि भाजप यांच्यात कडवी लढत पहायला मिळाली होती. पारदर्शकतेच्या मुद्द्यावरून झालेल्या या निवडणुकीत भाजपने मुसंडी मारल्याचे दिसत आहे. त्यामुळे शिवसेना की भाजप सत्ता स्थापन करणार हे अद्याप निश्चित झालेले नाही.

उद्धव ठाकरे म्हणाले, ''मुंबईचा महापौर शिवसेनेचाच होईल. शिवसेना नंबर वनचा पक्ष राहिला आहे. विधानसभेनंतर निकालांमध्ये फरक पडत असून, शिवसेना आपले स्थान बळकट करत आहे. भाजपने सत्ता, संपत्ती पणाला लावली होती, त्यानुसार त्यांच्या यशाचे विश्लेषण करा. आमचे उमेदवार फार थोड्या फरकाने पडले आहेत. सर्व शिवसैनिकांचे मी आभार मानतो. भविष्यातील रणनितीबाबत लवकरच कळेल. मी राजकीय विश्लेषक नाही. भाजपला आम्ही महाराष्ट्रात रुजविले आहे, भाजपवर मात करण्यासाठी आणखी काही दिवस लागतील. मराठी भाषिकांचे मी आभार मानतो. इतर भाषिक नागरिकांनीही शिवसेनेने मतदान केले आहे.मतदार याद्यांमधून मतदारांची नावे गायब होणे, हा मोठा घोळ आहे. निवडणूक आयोगाचे हे काम असून, यामागे षडयंत्र आहे का? याची निष्पक्षपणे चौकशी व्हायला हवी.'' 

Web Title: #VoteTrendLive Uddhav Thackeray talked about shiv sena win in mumbai