'कर्जमाफी होईपर्यंत कामकाज नाही '

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 14 मार्च 2017

मुंबई - देशात भाजपला मिळणारे यश पाहता राज्यात मुदतपूर्व निवडणुका होण्याची शक्‍यता कमी झाली असली तरी; प्रत्येक मुद्यावरून भाजपला अडचणीत आणण्याची रणनीती शिवसेनेने तयार केली आहे. त्याचाच भाग म्हणून राज्यातील शेतकऱ्यांवरील कर्ज माफ होईपर्यंत विधिमंडळाचे अर्थसंकल्पी अधिवेशन चालू देऊ नका, असे आदेशच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पक्षाच्या आमदारांना दिले आहेत, अशी माहिती पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी आज दिली. 

मुंबई पालिका निवडणुकीची आचारसंहिता लागू असतानाच शिवसेनेच्या मंत्र्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन शेतकऱ्यांचे कर्ज माफ करण्याची मागणी केली होती. विधिमंडळाच्या अर्थसंकल्पी अधिवेशनातही शिवसेनेने विरोधकांबरोबरच ही मागणी लावून धरली आहे. 

उत्तर प्रदेशमधील विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याची घोषणा भाजपने केली होती. त्याचधर्तीवर राज्यातही कर्जमाफी देण्याची मागणी शिवसेनेने केली आहे. शेतकऱ्यांची कर्जमाफी होत नाही तोपर्यंत अधिवेशन चालू देऊ नका, असे आदेश पक्षप्रमुखांनी दिल्याचे कदम यांनी सांगितले. 

पक्षप्रमुखांनीच आदेश दिल्यामुळे शिवसेनेचे आमदार या मुद्यावर आक्रमक होण्याची शक्‍यता आहे. या आठवड्यात राज्याचा अर्थसंकल्प सादर होणार आहे. या अर्थसंकल्पात कर्जमुक्तीसाठी तरतूद करण्यासाठी शिवसेना; तसेच विरोधी पक्षांकडून दबाव आणला जाणला जाणार आहे. 

Web Title: Waiver does not work until