कर्जमाफीसाठी पंतप्रधानांची भेट घ्या - शिवसेना 

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 16 मार्च 2017

मुंबई - कर्जमाफीवरून आक्रमक होत विधिमंडळाचे कामकाज रोखून धरणारी शिवसेना उद्यापासून कामकाजात सहभागी होण्याची शक्‍यता आहे. कर्जमाफीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घ्या व त्यांना विनंती करा, असा शांततेचा प्रस्ताव आज शिवसेना मंत्र्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मांडला. 

शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी शिवसेना मंत्र्यांनी मातोश्रीवर भेट घेतली. या वेळी विधिमंडळाचे कामकाज ही सुरू राहिले पहिजे व कर्जमाफी पण मिळायला हवी, अशी भूमिका ठाकरे यांनी घेतल्याचे सूत्रांनी सांगितले. या बैठकीनंतर शिवसेना मंत्री मुख्यमंत्र्यांना भेटण्यास वर्षा या निवासस्थानी आले. कर्जमाफीसाठी पंतप्रधानांची भेट घ्या व कर्जमाफीचा निर्णय करा, असा निरोप शिवसेना मंत्र्यांनी दिला. 

सरकारला विधिमंडळाचे कामकाज सुरळीत करण्यास शिवसेनेची मदत राहील, मात्र कर्जमाफीची ठोस भूमिका मुख्यमंत्र्यांनी घ्यावी, अशी शिवसेनेची मागणी आहे. 

Web Title: Waiver to meet the Prime Minister - Sena