वॉलमार्ट गो बॅक...

प्रकाश बनकर
सोमवार, 2 जुलै 2018

औरंगाबाद : फ्लिपकार्ट आणि वॉलमार्ट या दोन कंपन्यांमध्ये करार होणार आहे. यामुळे देशभरातील छोट्या व्यापाऱ्यांवर संकट ओढवण्याच्या भीतीने या कराराविरोधात देशभरातील सर्व व्यापारी एकजूट झाले आहेत. सोमवारी (ता.2) जिल्हा व्यापारी महासंघ, मराठवाडा चेंबर ऑफ ट्रेड अॅण्ड कॉमर्ससह जिल्ह्यातील 73 विविध संघटनांनी एकत्र येत या कराराविरोधात धरणे आंदोलन केले. यात वॉलमार्ट गो बॅकचा नारा देत हा करार रद्द करण्याची मागणी केली. 

गुलमंडीवर सकाळी दहा ते दुपारी बारादरम्यान हे धरणे आंदोलन करण्यात आले. वॉलमार्ट आणि फ्लिपकार्ट या कंपन्या करार करणार आहेत. या करारास सरकार मान्यता देणार आहेत. हा करार झाल्यास देशभरातील 6 कोटी किरकोळ विक्रेते व त्यांच्याकडे काम करणाऱ्या 25 कोटी लोकांची अडचण होईल. वॉलमार्ट कंपनीला बी-2बी ची परवानगी दिला असतानाही ते किरकोळ विक्री करीत आहेत. अशा नियम मांडणाऱ्या कंपनीने आता फ्लिपकार्टच्या माध्यमातून किरकोळ व्यापारात उतरण्याची तयारी केली आहे. 

यामुळे कोट्यवधी लहान व्यापारी या कंपनीशी स्पर्धा करू शकणार नाही. या विषयी दिल्ली येथील वरिष्ठ संघटना कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन ट्रेडर्स ,कॉम्पीटीशन कंट्रोल ऑफ इंडिया यांच्याकडे तक्रार दाखल केलली आहेत. तसेच पंतप्रधान, मुख्यमंत्री यांच्यासह विभागीय आयुक्‍त डॉ. पुरुषोत्तम भापकर यांना निवेदन देण्यात आले आहे. धरणे आंदोलनात वॉलमार्ट गो बॅक, स्वदेशी की घोषणा करणेवाले, मत भुलो 'मेक इन इंडिया' यासह विविध घोषवाक्‍य लिहलेले फलक हाती होते. आदोलनास महापौर नंदकुमार घोडले यांनीही भेट देत पाठिंबा दर्शविला.

Web Title: Wal-Mart Go Back ...