वंचित बहुजनला हव्यात 22 जागा; कॉंग्रेसचा सकारात्मक चर्चेचा दावा

वंचित बहुजनला हव्यात 22 जागा; कॉंग्रेसचा सकारात्मक चर्चेचा दावा

मुंबई- वंचित बहुजन आघाडीला आगामी निवडणुकीत कॉंग्रेस-राष्ट्रवादी आघाडीबरोबरच्या 22 जागा हव्या आहेत, असे पक्षाचे नेते माजी आमदार लक्ष्मण माने यांनी आज मुंबईत सांगितले. तर कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी वंचित बहुजन आघाडीच्या नेत्यांबरोबरची बैठक सकारात्मक झाल्याचे नमूद केले. या 22 जागांमध्ये बारामती, माढा, आणि नांदेड या महत्वाच्या जागांचादेखिल समावेश आहे.

या बैठकीनंतर लक्ष्मण माने म्हणाले की, आम्ही मतदारसंघांच्या मसुद्याबद्दल चर्चा केली आहे. त्यासोबतच जागेसाठीही आमची चर्चा झाली आहे, त्यावर निर्णय झालेला नाही. परंतु आम्ही आत्तापर्यंत 22 जागा जाहीर केलेल्या असल्याने आमच्या दृष्टीने अडचणीचा विषय आहे. तरीही राहुल गांधी आणि प्रकाश आंबेडकर यांच्या भेटीतून काही मार्ग निघायचा तो निघेल.

आम्ही ज्या जागा 22 जागा जाहीर केल्या आहेत, त्या जागा आम्हाला त्यांनी द्याव्यात अशी आमची मागणी आहे. आम्ही कॉंग्रेसला 30 तारखेपर्यंत अल्टीमेटम दिला होता. आता जागा हा प्रश्न महत्वाचा नसला तरी लवकर प्रश्न सुटण्याचा आमचा प्रयत्न असल्याचे माने म्हणाले.

कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, विरोधीपक्ष नेते राधाकृष्ण विखे-पाटील, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शिवाजीराव गर्जे, आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यासोबत वंचित बहुजन आघाडीचे अशोक सोनावणे, लक्ष्मण माने आदी नेत्यांची आज मुंबईत विरोधीपक्ष नेत्यांच्या बंगल्यावर बैठक झाली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com