पाण्याची समस्या बिकटच; 0.47 पाणीसाठा उपलब्ध

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 30 जून 2019

11 मोठ्या प्रकल्पांपैकी केवळ निम्न मनार प्रकल्पात 8 टक्‍के उपयुक्‍त पाणीसाठा शिल्लक आहे. इतर सर्व दहा मोठे प्रकल्प मृत साठ्यात आहेत. औरंगाबाद जिल्ह्यातील 16 मध्यम प्रकल्पांत उपयुक्‍त पाण्याचा थेंब शिल्लक नाही.

औरंगाबाद : मराठवाड्यातील 872 प्रकल्पात जुनअखेर क्षमतेच्या केवळ 0.47 टक्काच उपयुक्‍त पाणी शिल्लक आहे. लांबलेला व असमान बरसणाऱ्या पावसाने अजून प्रकल्पांची तहान भागविण्याचे काम सुरू केले नसल्याची स्थिती आहे. 

मराठवाड्यातील 11 मोठ्या प्रकल्पात 0.21 टक्का, 75 मध्यम प्रकल्पात 0.81 टक्का, 749 लघू प्रकल्पात 1.16 टक्का, गोदावरी नदीवरील 13 बंधाऱ्यात 0.03 टक्का, तेरणा, मांजरा, रेणा नदीवरील 24 बंधाऱ्यात उपयुक्‍त पाण्याचा थेंबही शिल्लक नसल्याची स्थिती आहे. 11 मोठ्या प्रकल्पांपैकी केवळ निम्न मनार प्रकल्पात 8 टक्‍के उपयुक्‍त पाणीसाठा शिल्लक आहे. इतर सर्व दहा मोठे प्रकल्प मृत साठ्यात आहेत. औरंगाबाद जिल्ह्यातील 16 मध्यम प्रकल्पांत उपयुक्‍त पाण्याचा थेंब शिल्लक नाही.

हीच स्थिती लातूरमधील 8, उस्मानाबादमधील 17 व परभणीमधील 2 मध्यम प्रकल्पाची आहे. नांदेडमधील 9 मध्यम प्रकल्पात 3 टक्‍के, तर बीडमधील 16 व जालन्यातील 7 मध्यम प्रकल्पांत 2 टक्‍के उपयुक्‍त पाणीसाठा शिल्लक आहे. 
2017 मध्ये मराठवाड्यातील 75 मध्यम प्रकल्पांत 28 जूनअखेर 19 टक्‍के तर 2018 जूनअखेर 14 टक्‍के उपयुक्‍त पाणीसाठा शिल्लक होता. तर 749 लघू प्रकल्पात 2018 मध्ये 9 टक्‍के शिल्लक असलेला उपयुक्‍त पाणीसाठा यंदा 28 जून अखेर 1 टक्‍क्‍यावर आला आहे.

औरंगाबाद जिल्ह्यातील 93 लघू प्रकल्पात केवळ 1 टक्‍का, बीडमधील 126 प्रकल्पात 1 टक्‍का, उस्मानाबादमधील 205 प्रकल्पांत 1 टक्का, नांदेडमधील 88 प्रकल्पात 4 टक्‍के, हिंगोलीतील 26 प्रकल्पांत 1 टक्‍का उपयुक्‍त पाणी शिल्लक आहे. परभणीमधील 22, जालन्यातील 57 व लातूरमधील 132 लघू प्रकल्पांत उपयुक्‍त पाण्याचा थेंब शिल्लक नसल्याची माहिती जलसंपदा विभागाच्या सूत्रांनी दिली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Water problem is critical zero point forty seven percentage water storage available