चिपळूण-खेडमध्ये नद्यांचे पाणी

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 7 जुलै 2019

खेड व चिपळूण तालुक्‍यांना आज सकाळपासून मुसळधार पावसाने झोडपले. वाशिष्ठी नदीपात्रातील पाण्यात मोठ्या प्रमाणात वाढ झाली. सायंकाळी शहरात काही भागांत पाणी भरण्यास सुरवात झाल्याने पूरस्थिती निर्माण झाली होती.

चिपळूण : खेड व चिपळूण तालुक्‍यांना आज सकाळपासून मुसळधार पावसाने झोडपले. वाशिष्ठी नदीपात्रातील पाण्यात मोठ्या प्रमाणात वाढ झाली. सायंकाळी शहरात काही भागांत पाणी भरण्यास सुरवात झाल्याने पूरस्थिती निर्माण झाली होती.

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील बहादूरशेख नाका येथील वाशिष्ठी पुलास पाणी लागल्याने पुलावरून वाहतूक बंद करून गुहागर बायपासमार्गे वळवण्यात आली. खेडमध्ये मच्छीमार्केटनजीकच्या परिसरात जगबुडी नदीचे पाणी घुसले आहे. 

मुसळधार पावसाने तालुक्‍यातील नदीपात्रात मोठी वाढ झाली. शहरातील वडनाका, खाटीक आळी येथे नदीचे पाणी आले होते. अडरे-कान्हे मार्गावरील पुलावर पाणी आले होते. परिसरातील शेतातही नदीचे पाणी घुसले होते. खेड-भरणे मार्गावरील गटार तुंबल्यामुळे महाड नाक्‍यानजीकच्या रस्त्यावर पाणी आले होते. त्यामुळे वाहनचालकांना कसरत करावी लागली. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Water of River in Chiplun Khed