महिलांना पाण्यासाठी उतरावे लागते, 60 फूट खोल विहिरीत!

महिलांना पाण्यासाठी उतरावे लागते, 60 फूट खोल विहिरीत!

नाशिक : सध्या राज्यभरात उन्हाचा कडाका चांगलाच वाढत आहे. असे असताना नाशिकजवळील बोर्डेचीवाडी गावात पाणी भरण्यासाठी महिलांना मोठी कसरत करावी लागत आहे. या गावातील महिलांना तब्बल 60 फूट खोल विहिरीत उतरून पाणी भरावे लागत आहे. 

नाशिक जिल्ह्यातील सर्वांत जास्त पाऊस पडणारे हे तालुके आहेत. या तालुक्यातीलच परिस्थिती बिकट बनली आहे. त्यामुळे 'धरण उशाला आणि कोरड घशाला' अशी परिस्थिती सध्या निर्माण झाल्याचे चित्र आहे. या गावातील महिलांना हंडाभर पाण्यासाठी मोठी वणवण करावी लागत आहे तर दुसरीकडे महिला पाण्यासाठी जीवघेणी कसरत करत विहिरीत उतरावे लागत आहे. 

दरम्यान, नाशिकमधील या विदारक परिस्थितीमुळे प्रचारात मग्न असलेल्या नेत्यांचे डोळे कधी उघडणार, असा सवाल आता केला जात आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com