रोटी घाटात पाणवठ्यांची गरज

अमर परदेशी
सोमवार, 30 एप्रिल 2018

पाटस - वन विभागाचा असंवेदनशीलपणा वन्यजीवांच्या मुळावर येत आहे. दौंड तालुक्‍यातील रोटी वनक्षेत्रात चक्क एकही पाणवठा नसल्यामुळे हरणांसाठी घाटातील डबकेच आधार बनला आहे. डबक्‍यातील दूषित पाणी पिऊन हरणे आपली तहान भागवीत आहेत. त्यामुळे वनक्षेत्रात तत्काळ पाणवठा करण्याची मागणी वन्यप्रेमींनी केली आहे.  

पाटस-बारामती राज्यमार्गालगत रोटी परिसरात तब्बल साठ एकराच्या पुढे वनक्षेत्र आहे. यामध्ये चिंकारा जातीच्या हरणांची संख्या लक्षणीय आहे. अगदी राज्यमार्गाच्या कडेला हरणांचे कळपच्या कळप लक्ष वेधून घेतात. मात्र, वनविभागाच्या डोळेझाकपणामुळे उन्हाळ्यात प्राण्यांचे पाण्यावाचून हाल होत आहेत. वनक्षेत्रात चक्क एकही पाणवठा करण्यात आलेला नाही. वनक्षेत्राच्या परिसरातही लांबवर पाणी उपलब्ध नाही. त्यामुळे हरणांचे वास्तव्य धोक्‍यात येऊ लागले आहे.

पाण्याच्या शोधार्थ हरणे नागरी वस्तीकडे धाव घेत आहेत. हरणे रोटी घाटातील एका डबक्‍यात साठलेल्या दूषित पाण्यावर तहान भागवीत आहेत.  उन्हाच्या तीव्रतेमुळे डबक्‍यातील पाणीही संपुष्टात येण्याच्या मार्गावर आहे. पाण्याच्या शोधार्थ भटकंतीमुळे अनेक हरणांचा अपघातात मृत्यू झाला आहे. कित्येकदा हरणांना मोकाट कुत्र्यांचा सामना करावा लागतो. वनविभागाच्या असंवेदनशीलतेमुळे हरणांचे वास्तव्य धोक्‍यात येत असल्याचा आरोप वन्यप्रेमींनी केला आहे.       

देऊळगावगाड्याप्रमाणे पाणवठे करा...
देऊळगावगाडा वनक्षेत्रात सकाळच्या पाठपुराव्याने तत्कालीन मुख्यवनसंरक्षक जीतसिंग यांच्या आदेशान्वये बशीच्या आकाराचे दोन पाणवठे करण्यात आले आहे. त्याप्रकारे या भागातही पाणवठे करण्यात यावे अशी मागणी होत आहे.

Web Title: water tank in Roti Ghat