बारामती जिल्ह्यात टॅंकरची संख्या ४४ वर 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 8 जानेवारी 2019

बारामती - जिल्ह्यात डिसेंबर महिन्यात सुरवातीला २३ वर असणारी टॅंकरची संख्या आता ४४ वर पोचली आहे. ९ शासकीय व ३५ खासगी टॅंकर जिल्ह्यातील सात तालुक्‍यांमध्ये सुरू आहेत.

बारामती - जिल्ह्यात डिसेंबर महिन्यात सुरवातीला २३ वर असणारी टॅंकरची संख्या आता ४४ वर पोचली आहे. ९ शासकीय व ३५ खासगी टॅंकर जिल्ह्यातील सात तालुक्‍यांमध्ये सुरू आहेत.

पुणे जिल्ह्यात मागील महिन्यात २३ टॅंकर सुरू होते. १७ गावे व १९१ वाड्यांना दुष्काळाच्या झळा तीव्र झाल्या. त्यामुळे तेथे टॅंकरद्वारे पाणीपुरवठा सुरू होता. आता काही दिवसांतच जिल्ह्यातील आणखी ७ गावे टंचाईच्या तीव्र झळांखाली आले. २४ गावे व ३०५ वाड्यावस्त्यांना टॅंकर सुरू झाले आहेत. जिल्ह्यातील सर्वाधिक पाणीटंचाईची झळ बसलेल्या बारामतीपासून सुरू झालेले टॅंकर आता जुन्नर, शिरूर, पुरंदर, आंबेगाव, इंदापूरमध्ये सुरू झाले आहेत. पाण्याची गरज वाढू लागल्याने फेब्रुवारी, मार्चमध्ये नेमके काय होणार, याची चिंता आतापासूनच लागून राहिली आहे. 

देशभरात पहिल्यांदाच विक्रमी ३२५ लाख टन साखर उत्पादन होणार म्हणून चिंतेची आवई उठवलेल्यांना आता भीषण दुष्काळामुळे पुढील वर्षी बंपर पिकाची भीती घालता येणार नाही, अशी स्थिती निर्माण झाली आहे. जिल्ह्यातील सव्वातीन लाख एकर उसाच्या पिकाच्या क्षेत्रापैकी आतापर्यंत एक लाख एकराचाही आकडा अजूनपर्यंत ओलांडला नाही. उसाची लागवड यंदा जवळपास खुंटली आहे. एकरी चाळीस ते साठ हजारांपर्यंतचा खर्च पाण्याच्या भरवशावर करणाऱ्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी आपले हात आखडते घेतले. पुढील वर्षीच्या हंगामात उसाची मोठी टंचाई जाणवण्याची चिन्हे आताच दिसू लागली आहेत. सध्या उभ्या असलेल्या उसाचेच नेमके काय करायचे, हा प्रश्‍न शेतकऱ्यांपुढे  आहे. 

कडधान्यांकडेही फिरविली पाठ
पुणे जिल्ह्यात कडधान्याचे सरासरी क्षेत्र ५८ हजार हेक्‍टरच्या आसपास आहे. मात्र, आतापर्यंत जिल्ह्यात केवळ १६ हजार हेक्‍टरपर्यंतच पेरणी झाल्याचा अंदाज कृषी विभागाने व्यक्त केला आहे. पाऊसच नसल्याने कडधान्यांना बाजारभाव मिळत असला, तरी त्याचा धोका पत्करायला शेतकरी या वर्षी तयार नाहीत. केवळ ३० टक्‍क्‍यांपर्यंतच या पेरण्या झाल्याने यंदा कडधान्याचे बाजार भलतेच वाढतील, अशीही चिन्हे आहेत.

Web Title: water tankers is more 44 in baramati district