पाणीपुरवठ्यातून टॅंकरमुक्तीकडे - चंद्रकांत पाटील

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 19 डिसेंबर 2018

मुंबई - राज्यात ज्या भागात टॅंकरद्वारे पाणीपुरवठा होतो तेथे तात्पुरती पाणीपुरवठा योजना सुरू करून नागरिकांना पाणी पुरविण्याचे नियोजन करण्यात आले आहे. आवश्‍यक तेथे चारा छावण्या सुरू करण्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना अधिकार देण्यात आले असून, ज्या भागात पाण्याची उपलब्धता आहे, तेथे शेतकऱ्यांना मोफत बियाणे आणि खते देऊन चारा लागवडीसाठी प्रोत्साहित केले जाईल, असे मदत व पुनर्वसन मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले. 

राज्यात दुष्काळ घोषीत केलेल्या तालुक्‍यांमध्ये राबवायच्या योजनांची आढावा घेणारी मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रालयात झाली. या वेळी ते बोलत होते. पाटील या वेळी म्हणाले की, जालना, बुलढाणा, अकोला, सातारा या जिल्ह्यांतील काही तालुक्‍यांमध्ये दुष्काळ जाहीर करण्याबाबत मागणी होत आहे. मात्र दुष्काळ जाहीर करण्यासाठी तेथील जिल्हा प्रशासनाने त्याबाबतचा अहवाल दोन दिवसांत सादर करावा, असे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांना पाटील यांनी दिले.

दुष्काळ जाहीर झालेल्या भागातील विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ केले असून, ज्या विद्यापीठांनी असे शुल्क वसूल केले असेल ते परत करण्याबाबत कुलगुरूंना निर्देश देण्यात आले आहे. त्याचबरोबर दुष्काळी भागात शेतकऱ्यांकडून कर्जाची वसुली करू नये असे निर्देशदेखील सहकार विभागाने दिले आहे. पिण्याच्या पाण्याच्या योजना वीजबिल न भरल्यामुळे बंद आहे अशा योजनांसाठी शासनातर्फे पाच टक्के वीजबिल भरून त्या तातडीने सुरू करण्यात येणार आहे. त्यासाठी २९ कोटी रुपये अदा करण्यात आले असून, उद्यापासून बंद योजना पूर्ववत सुरू होतील, असेही पाटील यांनी सांगितले.

Web Title: Watersupply Tankerfree Chandrakant Patil