राऊत-अंधारे यांच्या टीकेला उत्तर देण्यास आम्ही रिकामटेकडे नाही; उदय सामंत यांचा टोला | We can not respond to sanjay Raut- sushma Andhare's criticisms says Uday Samant | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Uday Samant

राऊत-अंधारे यांच्या टीकेला उत्तर देण्यास आम्ही रिकामटेकडे नाही; उदय सामंत यांचा टोला

मुंबई - मागील काही दिवसांपासून बारसू येथील रिफायनरीचा वाद पेटला आहे. त्यातच भाजपनेते नारायण राणे आणि उद्धव ठाकरे गटाची शिवसेना यांच्यात सातत्याने वाद सुरू आहे. त्यातच सुषमा अंधारे आणि संजय राऊत सातत्याने शिंदे गटावरही टीका करत असतात. यावरून आज मंत्री उदय सामंत यांनी राऊत-अंधारे यांच्यावर खोचक टीका केली.

उदय सामंत म्हणाले की, निवडणुका झाल्यानंतर शिंदे-फडणवीस यांचाच सरकार असेल. महाविकास आघाडीची स्थापन झाली. शरद पवार साहेबांनी त्यांच्या पुस्तकार काय लिहिलं, त्याचं विश्लेषण करण्याऐवढा मोठा नाही. पवारसाहेबांनी लिहिलेल्या पुस्तकावर विश्लेषण करायला पिढ्यानपिढ्या खर्च कराव्या लागतील. त्यामुळे यावर माझ्यासारख्याने धाडस करून बोलणे योग्य नाही, असंही सामंत यांनी म्हटलं.

सुषमा अंधारे आणि संजय राऊत यांच्या टीकेवर सामंत म्हणाले की, राग मानू नये, पण सकाळी उठल्यानंतर एक पत्रकार परिषद होते. त्यानंतर ताईंची एक प्रेस होते. दिवसभर यांच्या पत्रकार परिषदांना उत्तर देण्यात वेळ घालवावा असा एवढा रिकामटेकडेपणा आमच्यात आलेला नाही. आमची मंडळी आहे, त्यांना उत्तर देतील, असा टोला सामंत यंनी लगावला.