esakal | सरकारनं पुकारलेल्या बंदची हायकोर्टानं दखल घ्यावी; फडणवीसांची मागणी
sakal

बोलून बातमी शोधा

fadnvis

सरकारनं पुकारलेल्या बंदची हायकोर्टानं दखल घ्यावी - फडणवीस

sakal_logo
By
अमित उजागरे

मुंबई : राज्य सरकारनं पुरकारलेल्या बंदची हायकोर्टानं दखल घ्यावी, अशी मागणी विधानपरिषदेचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. महाराष्ट्र बंदच्या पार्श्वभूमीवर फडणवीस यांनी राज्य सरकारवर सडकून टीका केली आहे. तसेच हा बंद बेकायदा असल्याचंही म्हटलं आहे.

फडणवीस म्हणाले, "स्वतंत्र भारताच्या इतिहासात पहिल्यांदाच ज्यांच्यावर कायदा आणि सुव्यवस्थेची जबाबदारी आहे त्यांनीच कॅबिनेटच्या बैठकीत बंदची घोषणा केली. नुकतेच सुप्रीम कोर्ट आणि मुंबई हायकोर्टानं अशा प्रकारच्या बंद करण्यावर बंदी घातली होती. तसेच शिवसेनेला दंडही ठोठावला होता. आमची मागणी आहे की, आजच्या बंदचीही हायकोर्टानं दखल घ्यावी"

loading image
go to top