उद्‌घाटनाचे निमंत्रण आम्हीच देऊ - खोत 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 27 डिसेंबर 2016

इस्लामपूर - पंधरा वर्षे सत्ता भोगूनही ज्यांना छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक करता आले नाही त्यांनी अरबी समुद्रातील शिवस्मारकाच्या उद्‌घाटनाचे स्वप्न पाहू नये, असा टोला कृषी व पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी जयंत पाटील यांचे नाव न घेता लगावला. या बरोबरच स्मारकाचे भूमिपूजन आम्ही केले व उद्‌घाटनही आमचे सरकारच करेल, पुढच्या पाच वर्षांत सुद्धा सत्तेवर येण्याची स्वप्ने पाहू नका, असा सूचक इशाराही खोत यांनी आज येथे पत्रकार परिषदेत दिला. 

राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी शिवस्मारकाची योजना आमची असून उद्‌घाटनही आम्हीच करू, असे वक्‍तव्य केले होते. त्यांच्या या विधानाचा सदाभाऊंनी आपल्या खास शैलीत समाचार घेतला व एवढ्या लवकर त्यांच्या पक्षाने सत्तेत येण्याची स्वप्ने पाहू नयेत, असा टोला लगावला. ते म्हणाले, ""काहींना शिवस्मारकाच्या उद्‌घाटनाची स्वप्ने पडू लागली आहेत. त्यांनी उद्‌घाटनाला यावे; मात्र आमच्या निमंत्रणावरच असे म्हणत जयंत पाटील यांच्या "राष्ट्रवादी कॉंग्रेस सत्तेवर येऊन आम्ही उद्‌घाटन करू' या वाक्‍याचा समाचार घेतला. 15 वर्षे सत्तेच्या काळात ज्यांनी जातीयवाद पेरून निवडणूक जिंकल्या त्यांनी उगाच वल्गना करू नये.'' 

Web Title: We invite to inauguration - Khot