
Gulabrao Patil: मंत्री पदाचा सट्टा लाऊन आम्ही तो निर्णय घेतला; गुलाबराव पाटालांच खळबळजनक वक्तव्य
मंत्री पदाचा सट्टा लाऊन आम्ही एकनाथ शिंदे यांच्या पाठीमागे जाण्याचा निर्णय घेतला असं खळबळजनक वक्तव्य मंत्री गुलाबराव पाटील यांनी केलं आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उत आला आहे. (We took that decision by betting on the position of minister gulabrao patil statement maharashtra politics )
जळगाव ग्रामीण मतदारसंघातील भोरखेडा इथे विकासकामांचं उद्धाटन तसेच भूमीपूजन सोहळ्याचं आयेाजन करण्यात आलं होतं. यावेळी गुलाबराव पाटील बोलत होते.
नेमकं काय म्हणाले पाटील?
शिवसेनेतून बाहेर पडण्यापूर्वी उद्धव ठाकरे चुकीच्या मार्गाने जात असल्याचं आपण त्यांना सांगितलं होतं. मात्र, संजय राऊत यांनी जायचं तर जा असं सांगितल्यानं आपणही बाळासाहेबांचे विचार असलेल्या आणि मराठा चेहरा असलेल्या एकनाथ शिंदे यांच्या पाठीमागे जाण्याचा निर्णय घेतल्याचे वक्तव्य मंत्री गुलाबराव पाटील यांनी केलं.
मंत्री पदाचा सट्टा लाऊन आम्ही तो निर्णय घेतला असल्याचं पाटील म्हणाले.
सत्तेचा प्रयोग फसला असता तरीदेखील मी शिंदे यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला असता. नागपूरपासून ते दादरपर्यंत सर्व गेले. त्यामुळे मी एकटा राहिलो असतो तर मतदारसंघात विकास करू शकलो नसतो, असंही त्यांनी सांगितलं.
सात महिन्यात पाच वेळा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे जळगावात आले, हा जोक नाही. असा मुख्यमंत्री आपल्याला कुठेही सापडणार नाही. सकाळी पाच वाजेपर्यंत काम करतात, साधारण माणूस आहे, एकच ड्रेसमध्ये राहतात असे म्हणत मुख्यमंत्र्यांचं पाटलांनी कौतुक केलं.