आम्ही न्यायालयात टिकणारं मराठा आरक्षण देणार- चंद्रकांत पाटील 

आम्ही न्यायालयात टिकणारं मराठा आरक्षण देणार- चंद्रकांत पाटील 

नाशिक- आधीच्या सरकारने मराठा आरक्षण दिले पण ते न्यायालयात टिकले नाही. आमचं सरकार मराठा आरक्षण देणार आणि ते आरक्षण न्यायालयात टिकणारं देखील असे राज्याचे महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज (ता. 14) स्पष्ट केले. नाशिकमधील पंजाबराव देशमुख वसतीगृहाच्या उद्घाटन कार्यक्रमाला ते उपस्थित होते त्यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमाला गिरीश महाजन यांचीही उपस्थिती होती.

राज्यातील पहिले अद्ययावत वसतीगृह नाशिक मध्ये सुरु करण्यात आले आहे, या वसतीगृहाचे उद्घाटन चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते आज करण्यात आले. या वसतीगृहाच्या इमारतीचे बांधकाम अवघ्या तीन महिन्यात पूर्ण करण्यात आले आहे. मराठा आरक्षणाच्या धर्तीवर मराठा संघटनांच्या मागणीनंतर वसतीगृहाचं काम सुरु करण्यात आले होते. राज्यातील मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांना मोफत राहण्याची सोय व्हावी म्हणून हे वसतीगृह बांधण्याचा निर्णय घेण्यात आला होता.

पुढे बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले की, विनायक मेटे हे मराठा समाजासाठी आरक्षण मागणारे जुने नेते आहेत. अनेक वर्षांपासून ते प्रयत्न करत आहेत. 1968 पासून आरक्षणाच्या चळवळीला सुरवात झाली, तेंव्हापासून मराठा समाज आरक्षणाची मागणी करत आहे. 1980 पासून आरक्षणाचा लढा मराठा समाजाकडून तीव्र करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले. तसेच, आण्णासाहेब पाटील यांनी पहिल्यांदा आरक्षणाच्या मागणीसाठी आत्महत्या केली असल्याचेही त्यांनी सांगितले. सध्या आरक्षणाचा मुद्दा न्यायालयात न्यायालयात आहे. मागासवर्गीय आयोगाचा अहवाल आल्यानंतर विशेष अधिवेशन बोलवणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, 15 नोव्हेंबर पर्यंत मागासवर्गीय आयोगाचा अहवाल येणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com