एसटी कामगारांना सोईसुविधा देणार : रावते 

एसटी कामगारांना सोईसुविधा देणार : रावते 

मुंबई : वेतनवाढीचा करार झाला नसला, तरी एसटी महामंडळातील कामगारांना सोईसुविधांपासून वंचित ठेवणार नाही, अशी ग्वाही परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी दिली आहे. त्यासंदर्भातील आदेशाचे परिपत्रक महामंडळाने 20 कामगार संघटनांना पाठवल्यामुळे मान्यताप्राप्त संघटनेची कोंडी झाली आहे. 

राज्य मार्ग परिवहन महामंडळातील कामगारांचा 2016 ते 2020 या चार वर्षांसाठी सोईसुविधांचा करार प्रलंबित आहे. वर्ग-3 आणि वर्ग-4 मधील कर्मचाऱ्यांना 2016 पासून विविध सोईसुविधा पुरवायच्या आहेत. त्यामध्ये महागाई भत्ता, वेतनवाढ, स्वतंत्र मार्ग भत्ता, विनाअपघात सेवा बक्षीस, पगारी सुट्या, रजा, सण उचल, विविध कामांसाठी अग्रीम, औपधोपचारांचा खर्च आदींचा समावेश आहे. 

कर्मचाऱ्यांना चार हजार 849 कोटींची एकत्र वेतनवाढ लागू करण्याची मागणी मान्यताप्राप्त कामगार संघटनेने लावून धरली होती; परंतु संघटना आणि एसटी प्रशासनाचे एकमत झाले नाही. त्यामुळे मोजक्‍या मागण्यांवर निर्णय झाल्यानंतर परिपत्रक काढण्याची तयारी एसटी प्रशासनाने दाखवली असून, तसा आदेश परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी दिला आहे. या संदर्भातील परिपत्रक 20 कामगार संघटनांनाही पाठवण्यात आल्यामुळे मान्यताप्राप्त संघटनेची अडचण झाल्याचे सांगितले जाते. 

एसटीचे कामगार नियमित सेवा देतात; त्यामुळे त्यांना सोईसुविधा देणे आवश्‍यक आहे. करारावर अद्याप सह्या न झाल्यामुळे त्यात अडचणी येत आहेत. म्हणूनच मान्यताप्राप्त संघटनेसोबत चर्चा करून मंजूर मागण्यांचे परिपत्रक काढणे गैर नाही. कामगार करार वाटाघाटी समितीशी झालेल्या चर्चेतील निर्णयानुसार हे परिपत्रक काढले जाणार आहे. 

- दिवाकर रावते, परिवहन मंत्री 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com