मुख्यमंत्री म्हणतात, 'मुंबईतील सर्व जागा जिंकू'

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 20 जुलै 2019

मुंबईने पंतप्रधान नरेंद्र मोदींवर भरभरून प्रेम केले आहे. त्यामुळे येत्या विधानसभा निवडणुकीत मुंबईतील छत्तीसच्या छत्तीस जागा जिंकून दाखवू, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुंबई भाजपचे नवनियुक्‍त अध्यक्ष मंगलप्रभात लोढा यांनी व्यक्‍त केला.

मुंबई : मुंबईने पंतप्रधान नरेंद्र मोदींवर भरभरून प्रेम केले आहे. त्यामुळे येत्या विधानसभा निवडणुकीत मुंबईतील छत्तीसच्या छत्तीस जागा जिंकून दाखवू, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुंबई भाजपचे नवनियुक्‍त अध्यक्ष मंगलप्रभात लोढा यांनी व्यक्‍त केला. भाजप प्रदेशाध्यक्षपदी चंद्रकांत पाटील, तर मुंबई भाजप अध्यक्षपदी मंगलप्रभात लोढा यांची नुकतीच नियुक्‍ती जाहीर झाली. चंद्रकांत पाटील यांनी प्रदेशाध्यक्षपदाचा पदभार बुधवारी स्वीकारला.

दादर येथील वसंतस्मृती कार्यालयात मंगलप्रभात लोढा यांनी शुक्रवारी आपल्या पदाचा कार्यभार स्वीकारला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मावळते मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांच्यासह मंत्री, आमदार तसेच सर्व प्रमुख पदाधिकारी या वेळी उपस्थित होते. मंगलप्रभात लोढा यांचा या वेळी सत्कारही करण्यात आला.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे धर्मराज युधिष्ठिराची नीती आहेच, पण त्याचसोबत पक्ष तसेच सरकारला संकटातून बाहेर काढण्यासाठी श्रीकृष्णाचे चातुर्यही आहे, अशी स्तुती लोढा यांनी केली. मावळते अध्यक्ष आशिष शेलार यांनी गेल्या सहा वर्षांत अतिशय चांगली कामगिरी केल्याचे सांगत लोढा यांनी त्यांचे आभारही मानले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: we will win all seats of Mumbai says Devendra Fadnavis