कुठं उष्णतेची लाट, कुठं गारपीट; हवामान विभागाचं काळजी घेण्याचं आवाहन

आज काही ठिकाणी गारपिटीची शक्यताही वर्तवण्यात आली आहे.
Heatwave and heavy rain
Heatwave and heavy rainSakal

गेल्या २४ तासांमध्ये राज्यातल्या काही भागांमध्ये वादळी वारा आणि गडगडाटासह पाऊस झाला. काही ठिकाणी गारपीटही झाली. आता असंच वातावरण पुढचे दोन दिवसही पाहायला मिळणार आहे. तर काही ठिकाणी उष्णतेच्या लाटेची शक्यताही हवामान विभागानं वर्तवली आहे.

पुढचे दोन दिवस राज्यातल्या काही भागांमध्ये गडगडाटासह हलक्या पावसाची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. सातारा आणि सांगली या दोन्ही जिल्ह्यांनी आज विशेष खबरदारी घेण्याचं आवाहन हवामान विभागाने केलं आहे. तर आज काही ठिकाणी गारपिटीची शक्यताही वर्तवण्यात येत आहे.

त्यानंतर काही दिवस राज्यातल्या काही जिल्ह्यांमध्ये उष्णतेच्या लाटेची शक्यताही वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे राज्यातल्या सर्वच नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन हवामान विभागाकडून करण्यात आलं आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com