मान्सून अंदमान निकोबार बेटावर आज दाखल होण्याची शक्यता आहे. अंदमान-निकोबारमध्ये मुसळधार पाऊस झाला असून येत्या २४ तासात अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. अंदमान-निकोबारनंतर पुढच्या पाच दिवसात बंगालचा उपसागर आणि अरबी समुद्रातही मान्सून (Monsoon Update) पोहोचेल असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.