Weather Update : राज्यात जूनमध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस; मॉन्सूनचा सुधारित अंदाज जाहीर

नैऋत्य मोसमी वाऱ्यांच्या (मॉन्सून) हंगामात देशात सरासरी इतक्या (९६ टक्के) पावसाची शक्यता
weather update rain forecast Below average rainfall Maharashtra June Monsoon forecast announced
weather update rain forecast Below average rainfall Maharashtra June Monsoon forecast announcedesakal

पुणे : यंदा नैऋत्य मोसमी वाऱ्यांच्या (मॉन्सून) हंगामात देशात सरासरी इतक्या (९६ टक्के) पावसाची शक्यता आहे. तर महाराष्ट्रात जून महिन्यात यंदा सरासरीच्‍या तुलनेत कमी पाऊस पडण्याची शक्यता असल्याचे भारतीय हवामानशास्त्र विभागाने (आयएमडी) मॉन्सूनच्या सुधारित अंदाजात म्हटले आहे.

‘आयएमडी’तर्फे शुक्रवारी (ता. २६) घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत हवामानशास्त्र विभागाच्या वातावरणीय देखरेख आणि संशोधन केंद्राचे प्रमुख डॉ. डी. एस. पै यांनी ही माहिती दिली. यावेळी मॉन्सूनचा सुधारित दीर्घकालीन अंदाज जाहीर करण्यात आला.

त्यानुसार यंदा जून ते सप्टेंबर (मॉन्सून काळात) दरम्यान देशात सरासरीच्या ९३ टक्के पावसाची शक्यता असून त्यात चार टक्के कमी-जास्त तफावत असू शकते. तर मॉन्सूनवर अवलंबून असलेल्या भागात ९४ ते १०६ टक्के इतक्या सरासरीचा अंदाज आहे.

weather update rain forecast Below average rainfall Maharashtra June Monsoon forecast announced
Weather Update : 'या' जिल्ह्यांवर अस्मानी संकट; मेघगर्जनेसह वादळी पावसाची शक्यता

दरम्यान, अंदाज जाहीर करताना सादर करण्यात आलेल्या नकाशानुसार राज्याची स्थिती पाहता मॉन्सून हंगामात उत्तर मध्य महाराष्ट्र, पश्‍चिम विदर्भासह मराठवाडा येथे पावसाची शक्यता कमी असल्याचे स्पष्ट होत आहे. तसेच जून महिन्यात देशासह राज्यात सरासरीपेक्षा कमी पावसाची शक्यता आहे.

यावेळी डॉ. पै म्हणाले, ‘‘यंदा जून महिन्यात सरासरीपेक्षा पावसाची शक्यता कमी असल्याने शेतकऱ्यांनी देखील पेरणीसाठी घाई करू नये. पेरणी करताना किमान एक आठवडा पावसाची स्थिती पाहणे आवश्‍यक असते. त्यामुळे पुरेसा पाऊस झाल्यावरच पेरणी करावी. यासाठी ‘आयएमडी’च्या वतीने कृषी क्षेत्रासाठी देखील विशेष अंदाज जाहीर केला जात असून त्याची वेळोवेळी पाहणी करावी.’’

weather update rain forecast Below average rainfall Maharashtra June Monsoon forecast announced
Unseasonal Rain : जुनी शेमळी परिसरात वादळी वाऱ्यासह जोरदार अवकाळी पाऊस; लाखोंचे नुकसान

सरासरी म्हणजे किती?

सरासरी पावसाची स्थिती पाहता १९७१ ते २०२० या कालावधीत देशात मॉन्सून काळात सरासरी ८६८.६ मिलिमीटर पाऊस पडतो. तसेच सरासरीच्या ९६ ते १०४ टक्के पाऊस हा सर्वसाधारण गृहित धरला जातो. परंतु सुधारित अंदाजानुसार या वर्षी मॉन्सून हंगामात सरासरी पाऊस पडण्याची शक्यता ४३ टक्के आहे. जी सर्वाधिक अशी मानली जाते. दरम्यान जून महिन्यात मात्र देशाच्या बहुतांश भागात पावसाची शक्यता कमी राहील असे नमूद करण्यात आले.

जून महिन्यातील अंदाज

- देशात सरासरीच्या तुलनेत कमी म्हणजेच ९२ टक्के पावसाची शक्यता

- जून महिन्यात देशात बहुतांश ठिकाणी कमाल तापमानात सरासरीपेक्षा वाढ

- वायव्य भारतात ही पावसाचे प्रमाण कमी

- महाराष्ट्रात बहुतांश भागांमध्ये पाऊस सरासरीपेक्षा कमी सुधारित अंदाजानुसार

- दक्षिण द्वीपकल्पा विशेषतः याच्या उत्तरेकडील ठिकाणी, हिमालय पर्वत पायथ्याच्या भागात सरासरी ते सरासरीपेक्षा कमी पाऊस

- मध्य भारतात काही भागात सरासरी ते सरासरीपेक्षा कमी पावसाची शक्यता

- देशाच्या द्वीपकल्पीय भागात, पूर्व मध्य भारत, ईशान्य भारतात सरासरीपेक्षा जास्त पावसाचा अंदाज

weather update rain forecast Below average rainfall Maharashtra June Monsoon forecast announced
Monsoon Update: पुढील दोन दिवसात मान्सून कोकणात दाखल; पण...

धन स्थिती अंदाज

मॉन्सून मिशन मॉडेल तसेच इतर मॉडेल्सच्या आधारे यंदा मॉन्सून कालावधीत ‘अल-निनो’ स्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. अल-निनोमुळे मॉन्सूनच्या पावसावर परिणाम होतो. दरम्यान, विषुववृत्ताजवळील बंगालचा उपसागर आणि अरबी समुद्राच्या तापमानातील फरक म्हणजेच ‘इंडियन ओशन डायपोल’ (आयओडी) मॉन्सून हंगामात पॉझिटिव्ह (धन स्थिती) राहण्याचा अंदाज आहे. ही स्थिती पावसासाठी अनुकूल असून यामुळे सरासरी पाऊस अपेक्षित आहे.

पावसाचा अंदाज (टक्क्यांत)

  • मध्य भारत - ९४ ते १०६

  • ईशान्य भारत - ९४ ते १०६

  • वायव्य भारत - ९२

  • दक्षिण भारत - ९४ ते १०६

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com