esakal | राज्यात वीजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता, रत्नागिरीत मुसळधार - IMD
sakal

बोलून बातमी शोधा

rain

हवामान विभागाच्या माहितीनुसार मंगळवारपर्यंत (ता. १२) बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याची शक्यता असून त्याची तीव्रता वाढेल.

मान्सूनचा परतीचा प्रवास; रत्नागिरीत अतीमुसळधार पावसाची शक्यता

sakal_logo
By
टीम ई सकाळ

पुणे - राज्यात गेल्या आठवड्यापासून विविध ठिकाणी मुसळधार पावसाची नोंद होत असताना आता पुढील दोन दिवसात पावसाचा जोर ओसरण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. तर रविवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये मध्य महाराष्ट्र, कोकण व मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची नोंद झाली. सध्या मॉन्सूनचा परतीचा प्रवास सुरू असून सोमवारी मध्य महाराष्ट्र आणि कोकणात तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता आहे. तर विदर्भात हवामान कोरडे राहणार आहे. रत्नागीरीत मुसळधार ते अतीमुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.

हवामान विभागाच्या माहितीनुसार मंगळवारपर्यंत (ता. १२) बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याची शक्यता असून त्याची तीव्रता वाढेल. हे कमी दाबाचे क्षेत्र ओडिशा व आंध्र प्रदेश किनाऱ्याकडे सरकण्याची शक्यता आहे. तसेच पूर्व मध्य अरबी समुद्रात कर्नाटकच्या किनाऱ्यालगत चक्राकार वाऱ्यांची स्थिती सक्रिय आहे. परिणामी राज्यात काही ठिकाणी पुढील दोन दिवस जोरदार पावसाची शक्यता आहे.

मॉन्सूनने राजस्थान येथून परतीची वाटचाल सुरू केल्यानंतर तीनच दिवसांत संपूर्ण उत्तर भारतातून मॉन्सून परतला आहे. दरम्यान परतीच्या वाटचालीसाठी सध्या पोषक हवामान असल्यामुळे पुढील दोन दिवस महाराष्ट्र, झारखंड, मध्य प्रदेश, ओडिशा आदी भागातून मॉन्सून परतण्याची चिन्हे आहेत. परिणामी १२ ऑक्टोबरनंतर राज्यात पावसाचा जोरही कमी होईल.

loading image
go to top