
Video: उन्हाच्या तडाख्यातून वाचण्यासाठी लग्नाच्या वऱ्हाडाने लढवला जुगाड
सध्या देशात उष्णतेच्या लाटेने थैमान घातले आहे.सोबतच उन्हाळा आला की लग्नसंमारंभाचा सीजन असतो त्यामुळे लग्नसोहळ्यात उन्हाचे चटकेही सहन करावे लागते. मात्र आता तुम्हाला लग्नसोहळ्यात उन्हाचे चटके करावे लागणार नाही. कारण सध्या सोशल मीडियावर एक असा जुगाड व्हायरल होतोय जो जुगाड तुम्ही पण ट्राय करण्याचा प्रयत्न करणार.
या व्हायरल व्हिडिओत उन्हाचा त्रास होऊ नये म्हणून चक्क लग्नाच्या वऱ्हाडीत पोर्टेबल सन शेड बनवले आहे. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय. (Wedding procession makes portable sun shade to protect from the heatwave video goes viral)
हेही वाचा: मी माझ्या आईला गमावलंय; नमाज पठण करताना इम्तियाज जलील भावूक
या संदर्भात भारतीय हवामान विभागातील वरिष्ठ वैज्ञानिक कृष्णानंद होसाळीकर यांनी हा व्हिडिओ शेअर करत या जुगाडचे कौतुक केले.
हेही वाचा: राऊतांचा अग्रलेख म्हणजे आंब्याच्या झाडाला काकडी, 'चीन सोडा भोंग्यांचं बोला'
राज्यातील तापमान (Weather Update) दिवसेंदिवस भडकत आहे. अनेक जिल्ह्यांचे तापमान हे चाळीशी पार गेले आहे. त्यातच आता हवामान विभागाने मध्य महाराष्ट्रातील चार शहरांना ऑरेंज अलर्ट (Orange Alert) दिला आहे. तसेच, अतिआवश्यक असल्याशिवाय दुपारी घराबाहेर न पडण्याचा सल्लाही हवामान विभागाने दिला आहे
विदर्भातल्या (Vidarbha)चार जिल्ह्यांमध्ये आजपासून तापमान असेच वाढत राहील, असा इशारा हवामान विभागाने दिला आहे. प्रादेशिक हवामान विभागाने व्यक्त केलेल्या अंदाजानुसार विदर्भातील यवतमाळ (Yawatmal), चंद्रपूर (Chandrapur), वर्धा (Wardha), अकोला (Akola) चार जिल्ह्यांमध्ये आजपासून ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.
Web Title: Wedding Procession Makes Portable Sun Shade To Protect From The Heatwave Video Goes Viral
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..