सुप्रिया सुळेंनी सर्वच पक्षांतील आमदारांचे हसतमुखाने केले स्वागत

मुंबई - शिवसेनेचे नेते आमदार आदित्य ठाकरे यांचे बुधवारी विधान भवनात स्वागत करताना राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे.
मुंबई - शिवसेनेचे नेते आमदार आदित्य ठाकरे यांचे बुधवारी विधान भवनात स्वागत करताना राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे.

मुंबई - कठीण परिस्थितीतच राजकीय व्यक्‍तिमत्त्व तयार होत असतात. अजित पवार यांनी बंड केल्यानंतर पाणावलेल्या डोळ्यांच्या खासदार सुप्रिया सुळे महाराष्ट्राने पाहिल्या. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसच्या या मागील पाच दिवसांच्या सर्वांत कठीण काळात सुळे कणखरपणे उभ्या राहिल्या.

मागील पाच दिवसांतील भावनिक, राजकीय पातळीवरील संघर्षानंतर राज्यात महाविकास आघाडीच्या होऊ घातलेल्या सरकारचा आनंद त्या लपवू शकल्या नाहीत. नवनिर्वाचित आमदारांच्या स्वागतासाठी त्या विधानभवनाच्या प्रवेशद्वारावर उभ्या असलेल्या दिसल्या. सर्वच पक्षांतील आमदारांचे त्यांनी हसतमुखाने स्वागत केले. 

अजित पवारांनी बंड केल्यानंतर काही काळासाठी पक्षात निर्माण झालेली पोकळी त्यांनी अत्यंत जबाबदारीने भरून काढली. या जाणतेपणातूनच त्यांचा आज विधिमंडळातील वावर हा राष्ट्रवादी काँग्रेसला सुखावणारा होता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com