पश्‍चिम महाराष्ट्रात दमदार पाऊस

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 11 जुलै 2019

कोकणसह पश्‍चिम महाराष्ट्रात बुधवारी (ता. १०) पावसाने दमदार हजेरी लावली. मात्र, दुष्काळाने होरपळणाऱ्या मराठवाडा आणि विदर्भात अद्यापही पावसाची प्रतीक्षा आहे. पुढील चोवीस तासांमध्ये कोकणात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्‍यता आहे. तर, मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी काही सरी हजेरी लावतील, अशी माहिती हवामान खात्यातर्फे देण्यात आली.

मराठवाडा, विदर्भाला अद्यापही पावसाची प्रतीक्षा; कोकणात पोषक हवामान
पुणे - कोकणसह पश्‍चिम महाराष्ट्रात बुधवारी (ता. १०) पावसाने दमदार हजेरी लावली. मात्र, दुष्काळाने होरपळणाऱ्या मराठवाडा आणि विदर्भात अद्यापही पावसाची प्रतीक्षा आहे. पुढील चोवीस तासांमध्ये कोकणात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्‍यता आहे. तर, मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी काही सरी हजेरी लावतील, अशी माहिती हवामान खात्यातर्फे देण्यात आली. 

मॉन्सूनमुळे कोकणात पावसाला पोषक हवामान होत आहे. समुद्रावरून वाहणाऱ्या जोरदार वाऱ्यामुळे उद्या (ता. ११) समुद्र खवळून किनाऱ्यालगत उंच लाटा उसळण्याची शक्‍यता आहे. कोकणात मच्छीमारांनी मासेमारीसाठी समुद्रात न जाण्याचे आवाहन करण्यात आले आहे. देशाच्या बहुतांशी भागांत मॉन्सून पोचला असून, संपूर्ण देश व्यापण्यासाठी आणखी काही दिवसांचा कालावधी लागणार आहे. उत्तर प्रदेश आणि बिहार परिसरावर कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय झाल्याने पावसाला पोषक हवामान निर्माण होत आहे. मंगळवारी (ता. ९) दिवसभर पावसाचा जोर काहीसा ओसल्यानंतर आज दुपारनंतर कोकण किनाऱ्यालगतच्या समुद्रात ढगांनी दाटी केली आहे, तर मध्य महाराष्ट्र आणि विदर्भातही ढगाळ हवामान आहे. या परिसरात सकाळपासून अधूनमधून हलक्‍या सरी येत होत्या.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Western Maharashtra Rain Water