काय आहे मुख्यमंत्री साह्यता निधी?

money
money

मुंबई - मुख्यमंत्री साह्यता निधीचे काम अतिशय गतीने सुरू असून, २५ नोव्हेंबर २०१९ पासून १०६ प्रकरणांत ३५ लाख ८ हजार ५०० रुपयांची मदत रुग्णांना देण्यात आली.

त्याच प्रमाणे या योजनेसह रुग्णांना अन्य योजनांद्वारेही एकूण ४९५ प्रकरणांत मदत करण्यात आली आहे. मदत निधीकडे प्राप्त होणाऱ्या अर्जावर तातडीने कार्यवाही करून निकाली काढण्यात येतो, अशी माहिती मुख्यमंत्री सहाय्यता निधी कार्यालयाद्वारे देण्यात आली आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वैद्यकीय सहाय्यता निधीतून जलदरित्या रुग्णांपर्यंत मदत पोचविण्याच्या सूचना दिल्या आहेत. २५ नोव्हेंबरपासून वैद्यकीय सहाय्यतेसाठी कालपर्यंत ५८७ अर्ज प्राप्त झाले आहेत. यापैकी जवळपास ४९५ प्रकरणे मंजूर झाली असून, महात्मा फुले जन आरोग्य योजना, धर्मादाय रुग्णालये आणि मुख्यमंत्री सहाय्यता कक्षातून मदत देण्याची कार्यवाही सुरू आहे.

मुख्यमंत्री सहाय्यता निधीकडे प्राप्त होणाऱ्या अर्जावर कार्यवाहीसाठी विशिष्ट कार्यपद्धती निश्‍चित करण्यात आली आहे. प्राप्त होणाऱ्या अर्जापैकी महात्मा फुले जनआरोग्य योजनेसाठी पात्र रुग्णांना योजनेच्या पॅनेलवरील रुग्णालयाकडे उपचारासाठी पाठविण्यात येते. अशा १९२ प्रकरणांत रुग्णांना या योजनेचा लाभ दिला आहे. रुग्ण धर्मादाय रुग्णालयात उपचार घेत असल्यास धर्मादाय आयुक्तांच्या संकेतस्थळावरुन संबंधित रुग्णालयात आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील किंवा दारिद्य्ररेषेखालील घटकांसाठी उपलब्ध खाटांची माहिती घेतली जाते. पात्र रुग्णांना याअंतर्गत पूर्णत: मोफत किंवा ५० टक्के सवलतीच्या दराने उपचार प्राप्त होतात. अशी ८७ प्रकरणे धर्मादाय रुग्णालयांकडे पाठविण्यात आली आहेत. याशिवाय ‘कॉकेलर इम्प्लांट’ची प्रकरणे पुणे येथील अतिरिक्त संचालक आरोग्य सेवा यांच्याकडून हाताळली जातात. त्यांच्याकडे नऊ प्रकरणे पाठविण्यात आली आहेत.

महात्मा फुले जनआरोग्य योजना, धर्मादाय रुग्णालये आणि ‘कॉकेलर इम्प्लांट’ अशा पद्धतीने २८८ रुग्णांना मदत देण्यात आली  आहे. उर्वरित २०७ रुग्णांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून मदत देण्याचे निश्‍चित करण्यात आले असून, १०६ प्रकरणांत थेट रुग्णालयांकडे मदत वितरित केली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com