Rahul Gandhi : राहुल गांधींना पप्पू म्हंटल्यावर काय वाटतं? दिलं उत्तर म्हणाले... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Rahul Gandhi

Rahul Gandhi : राहुल गांधींना पप्पू म्हंटल्यावर काय वाटतं? दिलं उत्तर म्हणाले...

काही राजकीय नेत्यांची नावे ही विरोधकांनी ठेवलेली असतात. याच नावाने बरेच लोक त्यांच्यावर टीका करतात. अशातच अनेक नेत्यांच्या नावामध्ये सर्वात कॉमेडी नाव म्हणून चिडवणार नाव म्हणजे काँग्रेस नेते राहुल गांधी. जवळपास सर्वच पक्षाचे राजकीय नेते आणि समर्थक 'पप्पू' म्हणतात.

राहुल गांधींना कित्येकदा 'पप्पू' म्हणत, सोशल मीडियावर ट्रोल करतात. यावरच भारत जोडो यात्रेमध्ये घेतलेल्या एका मुलाखतीत यासंबंधी राहुल गांधींनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, मला या नावासंदर्भात काहीच अडचण नाही. पूर्वी माझ्या आजीला (इंदिरा गांधी) सुद्धा गुंगी गुडिया म्हणत होते आणि आज त्यांनाच आयर्न लेडी म्हणून ओळखलं जातं असं राहुल गांधी म्हणाले आहेत.

हेही वाचा: Ajit Pawar : अजित पवार मुख्यमंत्री झाले नाहीत याचं फडणविसांना वाटतय दुःख, संधी मिळाली असताना..

'द बॉम्बे जर्नी'ला दिलेल्या मुलाखतीत बोलताना राहुल गांधी म्हणाले की, "राजकारणात एकमेकांना वेगवेगळ्या नावांनी हाक मारणं हा प्रचाराचा एक भाग आहे. मला आज जे पप्पू म्हणत आहेत ते खरं तर मला आतून घाबरतात. मला कोणत्याही नावानं हाक मारायला हरकत नाही. मी त्या नावाचं स्वागतच करिन" असंही गांधी यावेळी बोलताना म्हणाले आहेत.

हेही वाचा: Uddhav Thackeray: भागवतांनी कार्यलायत बघावं कुठे लिंबू टाकला आहे का? उद्धव ठाकरे असं का म्हणाले?