
Mohit Kamboj : 'त्या' बारमध्ये मोहित कंबोज नेमके कशासाठी गेले होते?; पत्रकार परिषेद स्वतः केला खुलासा
मुंबईतील खार येथील रेडिओ बारमधील एक व्हिडिओ नुकताच शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी समोर आणला होता. या व्हिडिओत भाजपचे सदस्य मोहित कंबोज हे धिंगाणा घालत मुलींना घेऊन नाचत असल्याचा आरोप करण्यात आला होता. पण आता यांसह इतर आरोपांवर कंबोज यांनी स्वतः पत्रकार परिषद घेत खुलासा केला आहे. (What exactly did Mohit Kamboj in that bar disclosed by himself at press conference)
कंबोज म्हणाले, "घटना घडलेलं ठिकाण फॅमिली रेस्तराँ होतं, पण त्याला डान्सबार म्हटलं गेलं. संभाजी ब्रिगेडचे संघटनाप्रमुख सचिन कांबळे यांनी माझ्यावर केलेले आरोप खोटे आहेत. यापूर्वी माझ्यावर अनेकदा हल्ल्याचा प्रयत्न झाला आहे. परवाची घटना देखील माझ्यासाठी एक ट्रॅप होता. फक्त माझी इथं एक चूक झाली की, मला तिथं रात्री २ वाजता जायला नको होतं. पण घाटकोपर, चेंबूरच्या बाहेरचे लोक वांद्र्यात शस्त्र घेऊन का फिरत होते? ते तिथं काय करत होते? त्यांनीच रेस्तराँमध्ये येऊन धिंगाणा घातला, याची पोलिसांनी चौकशी करावी. तसेच संजय राऊत प्रत्येक वेळी अशा गोष्टीत कसे समोर येतात, त्यांचे या लोकांशी काय संबंध आहेत? याचीही चौकशी व्हायला हवी"
तर महाराष्ट्रातील नेत्यांच्या मुलांना तोंड दाखवायला जागा राहणार नाही
संजय राऊत वेडे झाले आहेत जेलमधून बाहेर आल्यानंतर त्यांच मानसिक संतुलन बिघडलं आहे. जर वैयक्तीकरित्या कुटुंबियांवर अशा प्रकारचे आरोप करणारं राजकारण महाराष्ट्रात सुरु असेल तर मी जेव्हा व्हिडिओ समोर आणेल तेव्हा महाराष्ट्रातील बड्या नेत्यांच्या मुलांना तोंड दाखवायला जागा राहणार नाही, असा इशाराही यावेळी कंबोज यांनी दिला.
कंबोज यांनी सांगितला घटनाक्रम
कंबोज म्हणाले, मोईन सलीम शेख नावाची व्यक्ती आम्ही होतो त्या रेस्तराँमध्ये आली तेव्हा त्याच्याकडं रिव्हॉल्वर होतं. पण त्याला माहिती नव्हतं की, मला मुंबई पोलिसांची सिक्युरीटी आहे. ही व्यक्ती आल आल्यानंतर माझे सुरक्षा पोलिसही आतमध्ये आले, तेव्हा ते तिथून पळायला लागले. त्याचवेळी खार पोलीसही तिथं दाखल झाले, त्यावेळी या रेस्तराँमध्ये २ वाजून २० मिनिटांनी मी माझ्या बायकोसोबत तिथं खुर्चीवर बसलो होतो. एक गाडी समोर आली असून त्यात काही अज्ञात लोक होते जे मला ट्रेस करत होते, माझ्यावर ट्रॅप लावून बसले होते. ही गाडी मोईन शेखच्या नावावर आहे. त्याच्यासोबत सचिन कांबळे, मोईन शेख आणि अज्ञात लोकही होते. मोईन शेखकडं एक रिव्हॉल्वर होतं हे लोक जसे पळाले त्याचवेळी रात्री मुंबई पोलिसांनी वेगानं वाहन चालवताना त्यांच्यावर चलान कापलं. त्यानंतर खार पोलिसांनी रेस्तराँवरही नियमभंग केल्याप्रकरणी चलान कापलं, त्यानंतरआम्ही तिथून निघून गेलो.
संजय राऊतांना दिला व्हिडिओ
पण आम्ही गेल्यानंतर सचिन कांबळे या व्यक्तीनं तिथं व्हिडिओ बनवला आणि त्यानं उपमुख्यमंत्री फडणवीस यांचं नाव घेतलं. तसेच त्यानं माझ्यावर विविध आरोप केले की, मी तिथं शिवीगाळ केली, मी पोलिसांना धक्काबुक्की केली, मी डान्स करत होतो, माझ्यासोबत अनेक मुली होत्या. पण याचा ते पुरावा देऊ शकले नाहीत त्यानंतर त्यांनी हा व्हिडिओ संजय राऊतांना दिला. पण संजय राऊत तर नव्या कथा तयार करण्यात पटाईत आहेत. त्यांनी सकाळी हा व्हिडिओ ट्विट केला. तसेच एक पत्रक फडणवीसांच्या नावे, मुंबई पोलिसांच्या नावे एक पत्र लिहिलं. यात त्यांनी माझ्यावर अनेक आरोप लावले.