esakal | पवारांच्या निवासस्थानी दिवसभरात नेमकं काय घडलं? वाचा सविस्तर घटनाक्रम
sakal

बोलून बातमी शोधा

What exactly happened today Sharad pawar residence in mumbai

दक्षिण मुंबईच्या सर्व पोलिस स्थानकाच्या हद्दीत जमावबंदीचा आदेश पोलिसांनी लागू केला होता. त्यामुळे आलेले कार्यकर्ते विविध ठिकणी थांबले होते. शरद पवार यांच्या निवासस्थानी राष्ट्रवादीचे सर्व नेते आणि पोलिस अधिकाऱ्यांच्या बैठका पार पडल्या. 'सिल्व्हर ओक' या शरद पवारांच्या निवासस्थानी कोणत्या घडामोडींचा सविस्तर घटनाक्रम खालीलप्रमाणे राहिला.

पवारांच्या निवासस्थानी दिवसभरात नेमकं काय घडलं? वाचा सविस्तर घटनाक्रम

sakal_logo
By
टीम ई सकाळ

मुंबई : माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांच्या विरोधात 'ईडी'ने गुन्हा दाखल केल्यानंतर शरद पवार स्वतःहुन ईडीच्या कार्यलयात जाणार असल्याची घोषणा त्यांनी केली होती. त्यासाठी आज(ता.27) सकाळपासून राज्यातील अनेक कार्यकर्ते आणि नेत्यांनी मुंबईकडे प्रयाण केलं.

दक्षिण मुंबईच्या सर्व पोलिस स्थानकाच्या हद्दीत जमावबंदीचा आदेश पोलिसांनी लागू केला होता. त्यामुळे आलेले कार्यकर्ते विविध ठिकणी थांबले होते. शरद पवार यांच्या निवासस्थानी राष्ट्रवादीचे सर्व नेते आणि पोलिस अधिकाऱ्यांच्या बैठका पार पडल्या. 'सिल्व्हर ओक' या शरद पवारांच्या निवासस्थानी कोणत्या घडामोडींचा सविस्तर घटनाक्रम खालीलप्रमाणे राहिला.

वेळ सकाळी 7.30 वाजता- सिल्व्हर ओकच्या दिशेने शरद पवारांना भेटायला  कार्यकर्त्यांची गर्दीला सुरवात (रत्नागिरीच्या जिल्हाध्यक्ष चित्रा चव्हाण या सिद्धिविनायकचं दर्शन घेतल्यानंतर प्रसाद घेऊन शरद पवारांच्या भेटीला)

सकाळी 8 वाजता- राष्ट्रवादीचे नेते आणि शरद पवारांचे नातू रोहित पवार  सिल्व्हर ओक या शरद पवार यांच्या निवासस्थानी पोहोचले.

सकाळी 8.30 - वाजल्यापासून सिल्व्हर ओकवरती पोलिस बंदोबस्त

सकाळी 9 वाजता- जितेंद्र आव्हाड आणि जयंत पाटील शरद पवार यांच्या भेटीला

सकाळी 9.15- राष्ट्रवादीचे नेते प्रफुल पटेल भेटीला

सकाळी 9.30- वाजल्यापासून शरद पवार आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या मॅरेथॉन बैठका सुरू

सकाळी 9.35 वाजता- कायदा आणि सुव्यवस्थेचे सहआयुक्त विनय चोबे पवारांच्या भेटीला (घराबाहेर पडू नका अशी विनंती केल्यानंतर ही शरद पवार आपल्या भूमिकेवर ठाम)

सकाळी 10.30- वाजता छगन भुजबळ आणि धनंजय मुंडे सिल्व्हर ओकवरती दाखल

सकाळी 11.30- वाजता राहुल गांधींचा शरद पवारांना फोन करून पाठिंबा

दुपारी 1 वाजता- अबू आझमी पवारांच्या भेटीला

दुपारी 1.15 वाजता- मुंबई पोलिस आयुक्त संजय बर्वे शरद पवारांच्या भेटीला. कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न म्हणून तुम्ही बाहेर पडू नका अशी पवारांना विनंती

दुपारी 1.45 वाजता- वाजेपर्यंत ईडीच्या कार्यालयात जायचं की नाही यावर बैठक 

दुपारी 1.50 वाजता - वाजता कायदा-सुव्यव्यवस्थेमुळे ईडीच्या कार्यालयात जाणार नसल्याची शरद पवारांची मीडिया समोर घोषणा

दुपारी 3 वाजता - वाजता शरद पवार पुण्यातील पूरग्रस्त दौऱ्यासाठी मुंबईतून रवाना...