
Uddhav Thackrey: राज्यपालाच्या आधारे मनमानी कारभार, अरविंद केजरीवाल अन् उद्धव ठाकरेंच्या भेटीत काय घडलं?
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल मातोश्रीवर दाखल झाले. उद्या ते शरद पवार यांची भेट घेणार आहेत. अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा अधिकार सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर दिल्ली सरकारला मिळाला मात्र, पण त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय केंद्र सरकारने अध्यादेश आणून तो निर्णय बदलला. हा अध्यादेश राज्यसभेत रोखण्यासाठी केजरीवाल यांनी नेत्यांच्या भेटीगाठी सुरू केल्या आहेत. त्याचाच भाग म्हणून ते ठाकरे आणि पवारांशी चर्चा करणार आहेत. पंजाबचे मुंख्यमंत्री भगवंत मान आणि खासदार राघव चढ्ढा देखील त्यांच्यासोबत आहेत.
या भेटीनंतर उद्धव ठाकरे आणि आलेल्या सर्व नेत्यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, 'आम्ही नातं कायम जपतो. प्रेमासाठी आणि नातं जपण्यासाठी मातोश्री ओळखली जाते. राजकारणाच्या पलीकडे जाऊन आम्ही नातं जपतो'. त्यानंतर अरविंद केजरीवाल बोलताना म्हणाले कि, आम्ही देखील नाते जपतो. एकदा नातं बनलं कि, आम्ही ते निभावतो.
तर अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा अधिकार सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर दिल्ली सरकारला मिळाला मात्र, पण त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय केंद्र सरकारने अध्यादेश आणून बदलला यावर बोलताना दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल बोलताना म्हणाले कि, दिल्लीतील जनतेने आतापर्यंत खुप लढाया लढल्या. त्यानंतर सुप्रिम कोर्टाने आमच्या बाजुने निर्णय दिला. त्यानंतरही भाजपने केंद्रात सरकार येताच दिल्लीतील आप सरकारचे सर्व आधिकार हिसकावले. राज्यपालाच्या आधारे मनमानी करणं चालु आहे.
तर देशातील ज्या राज्यात भाजपचे सरकार नाही त्याठिकाणी ईडी, सीबीआय मागे लावुन, आमिष दाखवुन धमकावून त्या ठिकाणची सरकारे पाडली जातात, आमदार, खासदार फोडले जातात. दिल्लीतील आप सरकार पाडता न आल्यामुळे त्यांनी हा अध्यादेश काढला आहे. अंहकारी आणि स्वार्थी माणूस देश चालवत असल्याचंही केजरीवाल म्हणालेत. तर शिवसेना (ठाकरे गट) या निर्णयात आप सरकारच्या सोबत आहे. मोदी सरकारच्या विरोधात सर्वांना लढायचे आहे असंही केजरीवाल यावेळी म्हणाले आहेत.
भाजपला देशात पराभवाची भिती वाटतं आहे. भाजपाचा मनमानी कारभार सुरू असल्याचंही ते यावेळी म्हणालेत. लोकशाही वाचवण्यासाठी आम्ही एकत्र आलो असल्याचं भगवंत मान आणि अरविंद केजरीवाल म्हणाले आहेत.
सर्वोच्च न्यायालयाने दोन निकाल दिले. एक शिवसेनेचा आणि दिल्लीचा. लोकशाहीत लोकप्रतिनीधीला महत्त्व असतं. मी आपची बाजू घेत नाही. त्यांच्याबाबत सुप्रीम कोर्टाने जो निर्णय दिला. तो लोकशाहीच्या बाजूचा होता. पण केंद्र सरकारने त्याविरोधात अध्यादेश आणला हे कोणती लोकशाही आहे. असेही दिवस येतील की राज्यातील निवडणुकाच होणार नाही. तर 2024नंतर फक्त लोकसभेच्या निडवणुका होतील. त्यामुळे लोकांनी जागं झालं पाहिजे, असं आवाहन अरविंद केजरीवाल यांनी केलं आहे.
आम्ही उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा केली. उद्धव ठाकरे यांनी केंद्र सरकारच्या विरोधातील अध्यादेशाला विरोध करण्याचं आश्वासन आम्हाला दिलं आहे. राज्यसभेत ते आम्हाला पाठिंबा देणार आहे. जर राज्यसभेत अध्यादेश रद्द झाला तर 2024मध्ये मोदी सरकार पुन्हा येणार नाही, असा विश्वास मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी व्यक्त केला आहे.
सध्याचं केंद्र सरकार अहंकारी आहे. या सरकारने आम्हाला सभागृह चालवण्यापासूनही रोखलं. आम्हाला त्यासाठी कोर्टात जावं लागलं. हे असंच चालू राहिलं तर उद्या पंतप्रधान आणि 31 राज्यपालांनी मिळूनच देश आणि राज्य चालवावं, असा हल्लाबोलही केजरीवाल यांनी केला आहे.