Chhatrapati Sambhaji Maharaj :संभाजी महाराजांच्या राजकीय योग्यतेविषयी काय म्हणतात इतिहासकार... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Chhatrapati Sambhaji Maharaj

Chhatrapati Sambhaji Maharaj : छत्रपती संभाजी महाराजांच्या राजकीय योग्यतेविषयी काय म्हणतात इतिहासकार...

Chhatrapati Sambhaji Maharaj : छत्रपती संभाजी महाराज्यांच्या विषयी प्रत्येकाकडे वेगवेगळे विचार आहेत, त्यांना छत्रपती शिवाजी महाराजांचा छावा म्हटले जायचे. आपल्या थोड्याश्या कारकीर्दीतही त्यांनी खूप उल्लेखनीय कामगिरी केली आहे. संघर्ष अगदी जन्मापासून त्यांच्याकडे लिहिलेला होता, लहानपणीच आई गेल्या, नवव्या वर्षी आग्र्याची मोहीम, पुढेही संघर्ष कमी नव्हता.

यासगळ्यात आप्तांकडूनच त्यांना पाठिंबा नव्हता, महाराज्यांच्या प्रधान मंडळातलेच व्यक्ती त्यांच्या विरोधात होते, पण असे असतांनाही त्यांच्या मनात कोणाच विषयी कटुता नव्हती. म. म. पोतदार म्हणतात, संभाजी महाराज गादीवर आले त्यावेळी राज्याचे यंत्र दुहीमुळे ढिलावले होते. असे ढिलावलेले यंत्र घेऊन त्यांनी औरंगजेबाशी टक्कर दिली. याबद्दल त्यांची तारीफच...

वडिलांच्या पाऊलावर पाऊल

शिवाजी महाराजांनी घालून दिलेले दंडक आणि तयार केलेली राजनीती त्यांनी चालूच ठेवली होती. संभाजी महाराज म्हणतात, “आबासाहेबांचे संकल्पित आहे ते आम्हास चालवणे अगत्य" इंग्रजांशी झालेल्या एका मैत्रीच्या करारात संभाजी महाराज म्हणतात, "माझ्या वडीलांचे वेळी जो शिरस्ता होता तोच मी पाळीन" गादीवर आल्यानंतर राज्ययंत्रणेवर आपली जरब बसविली. त्यामुळे वतनदार लोक दचकून वागू लागले.

निष्पक्षपाती न्याय

राज्यकारभाराचे व न्याय निवाड्याचे संभाजी महाराजांचे कित्येक कागद उपलब्ध आहेत. त्यावरून असे दिसते की, ते निष्पक्षपाती न्याय देत असत. सामान्यतः मनुष्याची कदर व औदार्य हे त्यांचे गुण पुष्कळ ठिकाणी व्यक्त झालेले आहेत.

शिवाजी महाराजांसारखाच लोकांबद्दल आदरभाव

धर्माच्या क्षेत्रांत, साधुसंत, देवदेवता, विद्वान ब्राह्मण यांच्याविषयी शिवाजी महाराजांसारखाच संभाजी महाराजांनी आदरभाव ठेवलेला आढळतो. बाटून मुसलमान झालेल्या अनेक ब्राह्मणांना शुद्ध करून पुन्हा हिंदूधर्मात घेण्याचे धाडस संभाजी महाराजांनी दाखविलेले दिसते.