"व्हॉट्‌सऍप'वर आता रिअल टाइम लोकेशन 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 1 फेब्रुवारी 2017

मुंबई - "व्हॉट्‌सऍप'वर आपल्या कॉन्टॅक्‍ट लिस्टमधील वापरकर्त्यांचे रिअल टाइम लाइव्ह लोकेशन "ट्रॅक' करण्याची सुविधा नव्या अपडेटमध्ये मिळणार आहे. 

मुंबई - "व्हॉट्‌सऍप'वर आपल्या कॉन्टॅक्‍ट लिस्टमधील वापरकर्त्यांचे रिअल टाइम लाइव्ह लोकेशन "ट्रॅक' करण्याची सुविधा नव्या अपडेटमध्ये मिळणार आहे. 

"व्हॉट्‌सऍप'चे हे नवे बिटा व्हर्जन ऍण्ड्रॉईड आणि आयओएस ऑपरेटिंग सिस्टिमच्या स्मार्टफोनसाठी वापरता येणार आहे. ट्रॅकिंगचा पर्याय एक मिनिटापासून अमर्याद कालावधीसाठी असणार आहे. महत्त्वाचे म्हणजे, ग्रुपमध्येही ही सुविधा वापरता येणार आहे. लाइव्ह स्ट्रिमिंग बंद करण्याचा पर्यायही वापरकर्त्यांकडे असेल. "व्हॉट्‌सऍप' यूझर्सना ही सुविधा ऍक्‍टिव्हेट करावी लागेल. गतवर्षाच्या अखेरीस "व्हॉट्‌सऍप'ने आयओएसच्या यूझर्सकरता मेसेज एडिटचा पर्याय दिला होता. तसेच, व्हिडिओ कॉलिंगची सुविधाही दिली होती. "व्हॉट्‌सऍप'चे भारतात 16 कोटी यूझर्स आहेत. दहा भारतीय भाषांमध्ये "व्हॉट्‌सऍप' उपलब्ध आहे. जगभरात 10 कोटी व्हॉट्‌सऍप कॉल केले जातात. 

"व्हॉट्‌सऍप' स्टेटस 
"व्हॉट्‌सऍप' कॉन्टॅक्‍ट लिस्टमधील एखाद्याने स्टेटस मेसेज बदलला की त्याचे नोटिफिकेशन वापरकर्त्यांना मिळणार आहे. "पुश नोटिफिकेशन'च्या माध्यमातून ही सुविधा यूझर्सना मिळेल. 24 तासांत नोटिफिकेशन डिलिट करण्याचाही पर्याय असेल.

Web Title: whatsapp on the real-time location